विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लंडन दौऱ्याच्या “कर्नाटकी यशा”नंतर राहुल गांधी 31 मे पासून 10 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर मध्ये मोदींची कॉपी करत भारतीय जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. इतकेच नाही तर, ते न्यूयॉर्क बरोबर वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आधी ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा भारतीय लोकशाही विषयी भाषणे करणार आहेत.Rahul Gandhi on 10 days visit to USA after karnataka victory
राहुल गांधींचा गेल्या काही महिन्यांपूर्वी लंडन दौरा झाला तेथे केंब्रिज विद्यापीठ आणि अन्यत्र दिलेल्या भाषणांमधून राहुल गांधींनी भारतीय लोकशाही विषयी खूप तक्रारी केल्या होत्या. भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे. लोकशाही संस्थांना मोदी सरकारने ताब्यात घेतले आहे. लोकशाहीचे चार स्तंभ स्वतंत्र उरलेले नाहीत, अशा आशयाची भाषणे त्यांनी लंडनच्या दौऱ्यात केली होती. तो दौरा त्यावेळी खूप गाजला. भाजपने राहुल गांधींनी देशाची परदेशात बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्या माफीची मागणी केली. पण राहुल गांधींनी माफी मागितली नाही त्यानंतर कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले काँग्रेसने अर्थातच “कर्नाटकी यशा”चे श्रेय राहुल गांधी प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांना दिले. त्यातही राहुल गांधींनी मोदी सरकार विरुद्ध सातत्याने राजकीय तलवार चालवून काँग्रेसला कर्नाटकात यश मिळवून दिल्याचे मानले गेले.
या पार्श्वभूमीवर 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींचा 10 दिवसांचा अमेरिका दौरा असणार आहे. या अमेरिका दौऱ्यात न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर मध्ये 5000 भारतीयांना संबोधित करणार आहेत. याच मॅडिसिन स्क्वेअर मध्ये मोदींनी 2018 च्या दौऱ्यात भारतीयांना संबोधित केले होते. अर्थात मोदींचा संबोधनाचा विषय इंडिया रायझिंग हा होता, तर राहुल गांधींच्या संबोधनाचा विषय भारतात लोकशाही नाही, हा असणार आहे. 10 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी तिथल्या राजकीय विचारवंत, अर्थतज्ञ, विविध व्यवसायिक, उद्योगपती यांच्याही भेटीगाठी घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या काही गुप्त बैठकाही होणार असून त्यांचे पडसाद गुजरात – महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने उमटण्याची दाट शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे.
22 जून रोजी मोदी अमेरिकेत
राहुल गांधींचा हा दौरा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. मोदींचा हा दौरा देखील राहुल गांधी यांच्या एवढा दीर्घ नसला तरी भारतीय राजकारणाच्या दृष्टीने दीर्घसूत्री असणार आहे. कारण मोदी तेथे अमेरिकन उद्योग समूहांना भेटी देऊन भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गुंतवणुकीविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. अर्थातच कर्नाटकची निवडणूक संपून निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय राजकारणाचा पट आता अमेरिकेत सरकला असून जून महिन्यात त्यावरची प्यादी, उंट, घोडे, हत्ती अमेरिकेतून हलणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App