प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे निकालामुळे महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात सत्तेवर परत येण्याच्या मनसूब्यांवर पाणी फेरले गेले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.Supreme Court dismissed bringing back MVA government in maharashtra
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अखेर गुरुवारी, ११ मेला निकाल लागला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाला दिला आहे. या निकालाचे वाचन गुरुवारी साडे बाराच्या सुमारास सुरू झाले. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला फटकारत अखेर शिंदे सरकारला मोठा दिलासा देणारा निकाला सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणले असते,’ म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.
सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी या निर्णयामुळे महाविकास आघाडी पक्षाच्या मनसुब्यावर पाणी फेरले असल्याचं फडणवीस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राबाबत आज दिलेल्या निकालाबाबत आम्ही पूर्ण समाधानी आहोत. निकालात ४-५ महत्त्वाचे मुद्दे आहेत. सर्वात आधी तर महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरत न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय की उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अपात्रतेच्या याचिकांबाबतचा सर्व अधिकार अध्यक्षांचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटलंय की अध्यक्ष आणि आयोगाला त्यांच्यासमोर येणाऱ्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचेही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आधी काही लोकांना शंका होती, त्याचे समाधान न्यायालयाने केले असावा.
अर्थात, ते सुप्रीम कोर्टाला मानत असतील तर त्यांच्या शंकेचे समाधान झालं असेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App