वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते पॅसिफिक बेटांच्या नेत्यांच्या बैठकीत सहभागी होतील. 30 एप्रिल रोजी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनीही पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन पॅसिफिक बेटांच्या नेत्यांमध्ये सामील होणार असल्याची माहिती दिली होती. US President Joe Biden likely to meet PM Modi this month, Pacific Island Leaders Meet to decide future strategy
व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी दिली ही माहिती
व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडेन जपानमधील हिरोशिमा येथील जी-7 लीडर्स समिटपासून ते या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे क्वाड लीडर्स समिटसाठी पापुआ न्यू गिनीला भेट देतील. वॉशिंग्टन डीसी येथे गेल्या वेळी झालेल्या पहिल्या यूएस-पॅसिफिक शिखर परिषदेच्या फॉलोअप संदर्भात बायडेन पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मारापे आणि पॅसिफिक बेटे फोरमच्या इतर नेत्यांना भेटतील.
US President Joe Biden will be meeting PM Narendra Modi later this month as the two leaders will join Pacific Islands leaders meet for a "historic" future-oriented meeting. (file pic) pic.twitter.com/xMtQEEFfhL — ANI (@ANI) May 9, 2023
US President Joe Biden will be meeting PM Narendra Modi later this month as the two leaders will join Pacific Islands leaders meet for a "historic" future-oriented meeting.
(file pic) pic.twitter.com/xMtQEEFfhL
— ANI (@ANI) May 9, 2023
गत महिन्यात पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी दिली माहिती
पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, जेव्हा इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा विचार केला जातो तेव्हा पापुआ न्यू गिनी आणि पॅसिफिककडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ते म्हणाले होते की, आमच्याकडे सामायिक जंगल आणि सागरी क्षेत्रासह जगातील सर्वात मोठे कार्बन सिंक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये 24 मे रोजी क्वाड लीडर्स समिट होणार आहे, जिथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज पीएम मोदी, जपानचे पीएम फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे स्वागत करतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App