वारस नेमण्यात पवारांना अपयश!!; सामनाची टीका; सामनाच्या अग्रलेखाला महत्व देत नाही, पवारांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी

सातारा : शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून सोमवारी करण्यात आला होता. या विषयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ठाकरे राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. सामना अग्रलेखाला मी महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले आहे.

मंगळवारी, ९ मेला प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘आम्ही पक्षात काय करतो, हे राऊतांना माहिती नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहित नाही. जयंत पाटील, आर. आर. पाटील अजित पवार, दिलीप वळसे पाटील या पक्षातील अनेक नेत्यांना कॅबिनेट मंत्री करून संधी दिली आहे. पण आम्ही कोणाला संधी दिली आणि काय केले हे जाहीर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामनाच्या अग्रलेखाला मी महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होत तो आमच्या घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचे काम करतो त्यांनी काहीही लिहू दे.’



‘आम्ही काय केले हे त्यांना माहिती नाही. आमचं एक वैशिष्ट आहे. आम्ही राष्ट्रवादीचे जे सहकारी त्यांच्यासोबत अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतही असतात, पण बाहेर जाऊन आम्ही त्यांची कधी प्रसिद्धी करत नाही. हा आमच्या घरातला प्रश्न असतो. आणि घरामध्ये आमच्या प्रत्येक सहकार्याला ठाऊक आहे की, आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे, नवीन नेतृत्वाची फळी यापक्षात कशी तयार केली जाते, याची खात्री पक्षातील सर्व सहकार्याला आहे, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar targets Sanjay Raut over his saamna editorial

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात