बिटविन द लाईन्स : 83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात; राजकीय कारकीर्द “इलॉजिकल एंड”च्या जाळ्यात!!

विशेष प्रतिनिधी

शरद पवारांनी निवृत्ती नाट्य घडवून त्याचा राजकीय धुरळा हळूहळू खाली बसत असताना पवारांनी निवृत्तीचा प्रस्ताव मागे घेणे म्हणजे नेमके काय घडले आहे??, याचे राजकीय अर्थ हळूहळू आता बाहेर येऊ लागले आहेत.Sharad Pawar’s political Career may meet its illogical end

पवारांनी निवृत्ती मागे घेऊन पंढरपूरचा दौरा सुरू केल्यानंतर, “83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात” असे मराठी माध्यमांनी पवारांच्या दौऱ्याचे वर्णन केले. हे वर्णन 100 % खरे आहे. कारण पवार खरंच पुन्हा मैदानात आले आहेत. स्वतःच्या खांद्यावर राष्ट्रवादीची धुरा घेऊन ते पुन्हा एकदा महाराष्ट्रभर प्रचार करणार आहेत. त्यांनी तसा इरादा देखील जाहीर केला आहे. अर्थातच पवार 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात मोठे स्टार प्रचारक असणार आहेत, इतकेच नाही तर ते विरोधी आघाडीच्या अनेक अध्वर्यूंपैकी सर्वात ज्येष्ठ अध्वर्यूही असणार आहेत… पण ही झाली बातम्यांच्या साध्या “लाईन्स” मधली वस्तुस्थिती!!



पण आता याच बातम्यांच्या “लाईन्स” मधले “बिटवीन द लाईन्स” वाचले, तर काय दिसते??, दिसते ते चित्र असे : “83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात”, याचा अर्थ पवारांची राजकीय कारकीर्द त्यांच्या निर्णयामुळे “लॉजिकल एंड”ला पोहोचलेली नाही हे सिद्ध झाले आहे.

प्रणवदांची कारकीर्द लॉजिकल एंडला

उदाहरणच द्यायचे झाले, तर प्रणव मुखर्जींचे देता येईल. पवारांना जसे पंतप्रधान व्हायचे होते, तशीच पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा त्यांच्या खूप आधी प्रणव मुखर्जींच्याही मनात होती. पण ती महत्त्वाकांक्षा कधीच पूर्ण होऊ शकली नाही. पण याचा अर्थ प्रणव मुखर्जींची राजकीय कारकीर्द “लॉजिकल एंड”ला पोहोचलीच नाही, असे मात्र नव्हे. उलट नाईलाजाने का होईना, पण सोनिया गांधींना प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करून त्यांना त्या पदावर विराजमान करावे लागले होते आणि त्यातून प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द “लॉजिकल एंड”ला पोहोचली.

पवारांच्या मनासारखे घडले नाही

पवारांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. कारण फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे “भीष्म पितामह” हे बिरूद लावून घेऊन पवारांना आपल्या राजकीय कारकीर्दीचा “लॉजिकल एंड” करता आला असता. किंबहुना त्यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय कायम ठेवला असता आणि आपल्या मनासारखी राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय व्यवस्था त्यांना करता आली असती, तर खऱ्या अर्थाने शरद पवारांची कारकीर्द “लॉजिकल एंड”ला पोहोचून थांबली, असे म्हणताही आले असते… पण तसे घडायचे नव्हते. किंबहुना पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या एकूण राजकीय परिस्थितीने तसे घडू दिले नाही, ही “बिटवीन द लाईन्स” वस्तूस्थिती आहे!!

तुल्यबळ आव्हानांपुढे दमछाक

आता ज्यावेळी पवार स्वतःच्या खांद्यावर वयाच्या 83 व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा घेऊन महाराष्ट्रभर प्रचार करणार आहेत, त्यावेळी त्यांच्या समोरचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक परफॉर्मन्स 2019 च्या निवडणुकीपेक्षा उंचावण्याचे असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष या राजकीय स्थानावर नेऊन ठेवून आत्तापर्यंत कधीही जमलेल्या “राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री” या संकल्पनेला आकार द्यावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या तुल्यबळ राजकारणात अर्थातच ही फार मोठी आव्हाने आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण चढत्या काळात देखील ही आव्हाने त्या पक्षाला पेलू शकली नव्हती. अशा स्थितीत “वयाच्या 83 व्या वर्षी योद्धा पुन्हा मैदानात” ही मराठी माध्यमांची भाषा कितीही आकर्षक असली, तरी या भाषेतून पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस साठी किती मोठे यश मिळेल??, हा त्यापेक्षाही मोठा सवाल आहे.

मराठी माध्यमांनी उचललेले चाणक्य

पवार हे मराठी माध्यमांनी उचलून धरलेले चाणक्य आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातल्या राजकीय कर्तृत्वाविषयी कोणतीही शंका नाही. पण त्यांच्या नेतृत्वाखालच्या आधीच्या समाजवादी काँग्रेस आणि नंतरच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निवडणूक परफॉर्मन्स विषयी मात्र नेहमीच शंकांच्या मोठ्या फटी राहिल्या आहेत. पवार मराठी माध्यमांचे जेवढे “लाडके” आहेत, तेवढे ते महाराष्ट्राच्या जनतेचे “लाडके” असते, तर आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला केव्हाच पूर्ण बहुमत मिळून महाराष्ट्राची संपूर्ण सत्ता ताब्यात आली असती. पण तसे कधीच घडले नाही.

त्यामुळे आता पवारांची राजकीय कारकीर्द प्रणव मुखर्जी यांच्यासारखी लॉजिकल एंडला जाणे तर सोडाच, पण मुलायम सिंहांची कारकीर्द जशी समाजवादी पक्षाचे “भीष्म पितामह” म्हणून आपल्या मुलाला मुख्यमंत्री करून “लॉजिकल एंड”ला पोहोचली, तशी देखील पवारांची राजकीय कारकीर्द “लॉजिकल एंड”ला पोहोचणे कठीण आहे.

यशापयशाचा शिक्का

कारण पवार स्वतःच वयाच्या 83 व्या वर्षी पुन्हा मैदानात उतरून लढाई मारायला निघाले आहेत. अर्थातच लढाईच्या नियमानुसार दोन वार देणे – दोन वार घेणे हे होत राहणार. त्यामुळे या लढाईचे जे यश आणि अपयश असेल, ते पवारांच्या पदरी बांधले जाईल. त्यामुळे शरद पवारांची पुढची पिढी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीतल्या अपयशाचा शिक्का बसण्यापासून वाचेल हे खरे, पण खुद्द पवारांची राजकीय कारकीर्द मात्र परफॉर्मन्स आधारित देखील “लॉजिकल एंड”ला पोहोचणे त्यामुळे कठीण होणार आहे!!

Sharad Pawar’s political Career may meet its illogical end

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात