मंदिराची भिंत तोडून गेटवर झेंडा लावला आणि भिंतीवर आक्षेपार्ह मजकूरही लिहिला
विशेष प्रतिनिधी
सिडनी : ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा मंदिरांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. वेस्टर्न सिडनीच्या रोझहिल उपनगरातील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. खलिस्तान समर्थकांनी शुक्रवारी सकाळी BAPS स्वामीनारायण मंदिरावर हल्ला केला आणि तोडफोड केली. Khalistanis rampage again in Australia vandalism of Swaminarayan Temple in Western Sydney
याला दुजोरा देताना ऑस्ट्रेलियन मीडियाने वृत्त दिले आहे की, शुक्रवारी सकाळी मंदिर व्यवस्थापनाला मंदिराच्या भिंती समोरून तोडलेल्या आणि गेटवर खलिस्तानी ध्वज लावण्यात आला असल्याचे दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये भिंतींवर ‘मोदींना दहशतवादी घोषित करा’ “Declare Modi Terrorist (BBC)” असेही लिहिलेले दिसत आहे.
‘’BBC चा खोटा प्रचार आणि मोदींविरोधी अजेंडा हिंदू मंदिरांवरील अशा हल्ल्यांना थेट जबाबदार आहे.’’ असं ट्वीट भारतीय जनता पार्टी परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रभारी डॉ विजय चौथाईवाले यांनी म्हटलं आहे.
False propaganda and anti-Modi agenda of @BBC is directly responsible for such attacks on Hindu temples. @TheAusToday https://t.co/xIIIqfB9C4 — Dr Vijay Chauthaiwale (Modi ka Parivar) (@vijai63) May 5, 2023
False propaganda and anti-Modi agenda of @BBC is directly responsible for such attacks on Hindu temples. @TheAusToday https://t.co/xIIIqfB9C4
— Dr Vijay Chauthaiwale (Modi ka Parivar) (@vijai63) May 5, 2023
ऑस्ट्रेलियात जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या खलिस्तानी कारवाया शांत झाल्यानंतर ही घटना घडली आहे. मंदिर व्यवस्थापनाने सांगितले आहे की NSW पोलीस अधिकारी मंदिरात हजर झाले आहेत आणि त्यांना तपासात मदत करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज प्रदान करण्यात आले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला मेलबर्नमधील तीन आणि ब्रिस्बेनमधील दोन हिंदू मंदिरांची खलिस्तान समर्थकांनी तोडफोड केली होती. आता या हल्ल्यानंतर तर खलिस्तान समर्थकांनी मंदिराची थोडफोड केल्यानंतर तिथे त्यांचा झेंडाही लावला आहे. ज्यावरून असे दिसून येते की त्यांना पोलीस प्रशासनाचेही भय राहिलेले नाही.
या अगोदर मेलबर्नच्या उत्तरेकडील उपनगरातील मिल पार्कमधील BAPS स्वामीनारायण मंदिराची 12 जानेवारीला सकाळी खलिस्तान समर्थकांनी तोडफोड केली होती. यासोबतच मंदिराच्या भिंतींवर विरोधी घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. मंदिराच्या भिंतींवर लिहिलेल्या घोषणांमध्ये खलिस्तान समर्थकांनी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेचे ‘शहीद’ म्हणून वर्णन केले आणि त्याचे कौतुकही केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App