विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाकरी फिरफिर फिरली फिरून पुन्हा भोपळे चौकात आली, अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहावेत त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येईल असा ठराव मांडला आहे, तर दुसरा ठराव शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तहहयात अध्यक्ष असावेत असा आहे.Sharad Pawar lifetime president of NCP
अर्थातच यशवंतराव चव्हाण यांच्या शिष्याने बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी मारली आहे. बाळासाहेब ठाकरे जसे तहहयात शिवसेनाप्रमुख होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख केले होते, तसेच शरद पवार तहहयात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष राहण्याच्या बेतात आहेत आणि आपली सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हातात देण्याची शक्यता आहे. कारण तसे ठराव राष्ट्रवादीच्या 15 जणांच्या समितीने केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे पवार परिवारा बाहेरच नव्हे, तर आपल्या कन्येच्याही हाताबाहेर जाऊ नये म्हणून पवारांनी ही व्यवस्था केल्याचे दिसत आहे. गेले तीन दिवस फार मोठ्या प्रचंड घडामोडी घडवून शरद पवारांनी भाकरी फिरवून फिरवून तिची भिंगरी केली आणि ती पुन्हा भोपळे चौकात आणून ठेवली.
राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांच्यापासून अजित पवारांपर्यंत पवारांनी नेमलेल्या समितीचे सर्वच्या सर्व 15 सदस्य उपस्थित आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App