#TheKeralaStory : द केरळ स्टोरीच्या पॉप्युलरिटीला दुसऱ्या केरळ स्टोरीचा रहमानी खोडा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केरळ मधील लव्ह जिहाद प्रकरणांवर झगझगीत प्रकाश टाकणारा सिनेमा “द केरळ स्टोरी” देशभरातच नव्हे, तर जगभरात लोकप्रिय ठरत असताना आणि केरळचे सत्य त्यामुळे उघड्यावर येत असताना केरळ मधल्या जिहादी तत्त्वांमध्ये अस्वस्थता पसरली आहे आणि आपली पापे उघड्यावर येत असल्याचे पाहताच त्यांचे कान उभे राहिले आहेत. त्यातून केरळ मधला एक वेगळा नॅरेटिव्ह समोर आणण्याचा प्रयत्न होत आहे आणि यामध्ये संपूर्ण भारताने डोक्यावर घेतलेला संगीतकार ए. आर. रहमान देखील सामील झाला आहे. The popularity of The Kerala Story is due to the Rahmani prank of the second Kerala Story

“द केरळ स्टोरी” सिनेमा पॉप्युलर होत असताना त्याने “दुसरी केरळ स्टोरी” आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सादर केली आहे. केरळच्या अळापुळा जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये हिंदू जोडप्याचे मोठ्या थाटामाटात लग्न लावण्याचा व्हिडिओ ए. आर. रहमान यांनी आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केला आहे आणि त्याला ही पण एक #केरळ स्टोरी पहा असा हॅशटॅग दिला आहे.

वास्तविक स्वतः ए. आर. रहमान हे धर्मांतरित मुस्लिम आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव राजगोपालन कुलशेखर आणि त्यांच्या स्वतःचे मूळ नाव ए. एस. दिलीप कुमार होते. परंतु नंतर वडिलांच्या मृत्यूनंतर दिलीप कुमार यांनी धर्मांतर करून स्वतःचे नाव अल्लारखा रहमान असे ठेवले. याच संगीतकार ए. आर. रहमान यांनी अळापुळा जिल्ह्यातील मशिदीत झालेल्या हिंदू जोडप्याच्या विवाहाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

वास्तविक हा विवाह मशिद कमिटीने आयोजित करण्यापेक्षा तिथले काँग्रेस खासदार अरिफ अली यांनी आयोजित केला आहे. “दुसरी केरळ स्टोरी” दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते त्यात उघडपणे सांगत आहेत. केरळ मधल्या इस्लामी जिहादी धर्मांतराचा पर्दाफाश होत असताना दुसरी केरळ स्टोरी जगासमोर आणण्याचा हा वेगळा जिहादी प्रयत्न आहे!!

The popularity of The Kerala Story is due to the Rahmani prank of the second Kerala Story

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात