प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यादरम्यान पवारांनी आत्मचरित्राद्वारे जे इतर नेत्यांना चिमटे काढले आहेत, त्याची प्रत्युत्तर आता मिळू लागली आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या प्रचनी पडणारे नव्हते, असा टोला शरद पवारांनी आत्मचरित्रातून उद्धव ठाकरेंना लगावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दात पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.Chief Minister is known to the world, everyone feels that I am a member of their family; Uddhav Thackeray’s reply to Pawar
मी मुख्यमंत्री म्हणून काय केले, हे जगजाहीर आहे. आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य वाटतो या पलीकडे आत्ता मी काही बोलणार नाही असे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणं हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं, असं शरद पवारांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात लिहिले आहे. तसेच पवारांनी उद्धव ठाकरेंना यांना मुख्यमंत्री केल्यास शिवसेनेमध्ये वादळ माजेल यांचा अंदाज आपल्याला नव्हता. हा उद्रेक शांत करण्यास शिवसेना नेतृत्व कमी पडले, असे देखील त्यांनी पुस्तकात मत मांडले आहे. त्यामुळे शरद पवारांनी लिहिलेल्या या मुद्द्यांवर उद्धव ठाकरें या प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी, ४ मेला पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
‘प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा आणि त्यात बोलण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मला असं वाटतंय, याच्या पलीकडे बोलणं हे योग्य नाही,’ अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.
‘अशी कोणतीही गोष्टी राष्ट्रवादीत घडेल….’
तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या निवृत्तीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं, हे करण्याचा अधिकार त्यांच्या अध्यक्षाला असतो. अजूनही त्याबाबत निश्चित निर्णय आलेला नाही, त्यामुळे तो निर्णय होऊ द्या. मग काय ते बोलायचं ते बोलेन. पण मला असं वाटतंय की, महाविकास आघाडीला कुठेतरी तडा जाईल, अशी कोणतीही गोष्टी राष्ट्रवादीत घडेल असे मला वाटत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App