गुंड्याभाऊचे उपोषण आणि चिमणरावाच्या तारा; एक (अ)राजकीय गोष्ट!!

विशेष प्रतिनिधी

गुंड्याभाऊ आणि चिमणराव हे दोघे मित्र. गुंड्याभाऊ पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आणि क्रिकेट टीमचा सदस्य. वाडिया कॉलेज विरुद्ध झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये गुंड्याभाऊला अंपायरने चुकीचे आउट दिले म्हणून गुंड्याभाऊने त्या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषण आरंभले. गुंड्याभाऊच्या सगळ्या मैत्रिणी त्याला समजावायला आल्या. पण गुंड्याभाऊने आपला निर्धार सोडला नाही. A “non political” story on current developments in maharashtra

त्याच्या उपोषणाच्या प्रारंभाचा फार मोठा समारंभ पुण्यात झाला. त्यासाठी मोठ-मोठे पुढारी येऊन गेले. गुंड्याभाऊच्या उपोषणाचे रोज बुलेटीन प्रसिद्ध होऊ लागले. पण गुंड्याभाऊ तो गुंड्याभाऊ. काही खाल्ल्यापिल्ल्याशिवाय त्याचे थोडेच भागणार!! गुंड्या भाऊला उपोषण काही सहन होई ना!! म्हणून मग चिमणरावाच्या साह्याने तो नहाणीघरात जाऊन खाऊ पिऊ लागला. बाहेर येऊन पुन्हा उपोषण करू लागला.

पण हे फार दिवस चालले नाही आणि एक दिवशी बिंग फुटायची वेळ आली. मग चिमणरावने स्वतःच एक युक्ती काढली आणि त्यानेच अमरावती, कलकत्ता, मद्रास, दिल्ली इथे “मनातल्या सभा” भरविल्या. त्या सभांमध्ये गुंड्याभाऊने उपोषण सोडावे म्हणून “मनातलेच” ठराव केले आणि त्यात ठरावाच्या हजारो सह्यांच्या तारा गुंड्याभाऊच्या उपोषण स्थळी येऊन धडकल्या!!

भारतातली जनता आपली “अशी” मनधरणी करीत आहे, हे पाहून गुंड्याभाऊलाही प्रेमाचे भरते आले. तो भावूक झाला आणि अखेर मैत्रिणीच्या हस्ते मोसंबीचा रस घेऊन त्याने उपोषण सोडले. अशी कथा चिं. वि. जोशी यांनी 1940 च्या दशकात लिहिली. ती त्याकाळी फार गाजली. नंतर 1970 च्या दशकात तिची दूरदर्शनवर मालिकाही झाली. ही गोष्ट आज 4 मे 2023 रोजी सहज आठवली!!

(ही गोष्ट आठवण्यामागे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा काहीही संबंध नाही. दिल्ली, चेन्नईतून आलेल्या फोनचा तर दूरान्वयेही संबंध नाही. तो संबंध कोणी जोडू नये. जोडावयाचा असल्यास ज्याची त्याची जबाबदारी!!)

A “non political” story on current developments in maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात