विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी खळबळ उडाली आहे, त्यामागची अनेक कारणे टप्प्याटप्प्याने बाहेर येऊ लागली आहेत. त्यापैकी एक कारण पवारांच्या घरातलेच वाद आणि भांडण असल्याचे सांगितले जाते. Inside struggle in NCP lead to sharad Pawar’s decision of quitting presidential post
सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार आणि त्या पुढची वेळी रोहित पवार विरुद्ध पार्थ पवार हा वाद सोडविण्याच्या दृष्टीने आणि आपला हात वरचाच ठेवण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण अर्थातच “पवार पॉलिटिक्स” नुसार त्यांनी एक एस्केप रूट ही त्यात ठेवला आहे. म्हणूनच त्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांकडे आणि नेत्यांकडे 2 – 3 दिवसांचा वेळ मागितला आहे.
आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशाच्या निमित्ताने पवारांनी निवृत्तीच्या मोठा खडा टाकून पाहिला आणि प्रतिक्रिया आजमावल्या. फारच तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर ब्रिदिंग स्पेस म्हणून 2 – 3 दिवसांचा वेळ मागितला, पण या सगळ्यांमध्ये जर घरातल्या वादामुळेच पवारांनी जर खरंच हा निर्णय घेतला असेल आणि त्यातून तो वाद सुटणार असेल, तर एवढी मोठी राजकीय मशक्कत करून बाकीच्या बलाढ्य राजकीय पक्षांची लढायला कसे बळ मिळेल??, हा खरा प्रश्न आहे.
एकतर सध्या कर्नाटकची निवडणूक सुरू आहे. तेथे फक्त जयंत पाटील प्रचाराला गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 46 उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. पण तिचे फक्त 9 उमेदवार उभे केले आहेत. यातून राष्ट्रवादी काँग्रेसला गमावलेला राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता नाही. म्हणजे एकीकडे कर्नाटक राज्याची महत्त्वाची निवडणूक सुरू असताना दुसरीकडे पवारांनी आपल्याच पक्षाला निवृत्तीच्या पेचात टाकले आहे. यातून पवारांना नेमके काय साध्य करायचे आहे आणि त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या प्रबळ अशा भाजप आणि शिवसेना या शक्तींशी राष्ट्रवादी काँग्रेस लढत देण्याइतपत किती तयार होईल??, हा खरा प्रश्न आहे.
कार्यकर्त्यांना धक्का
शरद पवारांचा हा निर्णय म्हणजे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी धक्का होता. सभागृहामध्येच नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. शरद पवार मात्र भूमिकेवर ठाम राहून सिल्व्हर ओकवर निघून गेले.
पवारांनी का सोडलं अध्यक्षपद?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App