
प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाने जमाविलेल्या गर्दीच्या आधारे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये नरे पार्कवर होत असताना त्या सभेत मुस्लिम मावळ्याची वेगळीच हवा तयार झाली आहे. मुख्यमंत्रीपदी 2024 ला उद्धव ठाकरे फिक्स, असे म्हणत या मुस्लिम मावळ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षांची हवा काढून टाकली आहे. Muslim Shivsainik pitching for Uddhav Thackeray’s chief ministership, punched NCP ambitions
मुंबईतील वज्रमूठ सभा शिवसेनेसाठी खूप प्रतिष्ठेची बनल्याने ठाकरे गटाने खूप मेहनतीने गर्दी जमवली आहे. या सभेत मुस्लिमांची संख्या लक्षणीय दिसते आहे आणि त्या संख्येतच एका मुस्लिम मावळ्याची वेगळी हवा तयार झाली आहे. त्याने आपल्या रक्ताने पोस्टर लिहिले आहे. जिंकेपर्यंत लढायचं. 2024 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फिक्स. कट्टर मुस्लिम मावळा, असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षांची हवाच काढून टाकली आहे.
अजित पवारांनी आणि जयंत पाटलांनी स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाला पक्ष वाढविण्याचा हक्क आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचाही हक्क आहे. ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. जयंत पाटलांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे. पण अजितदादांनी मात्र राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार केला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या वज्रमूठ सभेत मुस्लिम मावळ्याने रक्ताने 2024 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री “फिक्स” असे लिहून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षाची हवा काढून टाकल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
Muslim Shivsainik pitching for Uddhav Thackeray’s chief ministership, punched NCP ambitions
महत्वाच्या बातम्या
- ” उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’ असल्याने भविष्यात…” आशिष शेलारांनी लगावला टोला!
- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 317 तालुक्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ
- 263 कोटी रुपयांच्या कथित ‘स्ट्रीट फर्निचर घोटाळा’प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा बीएमसीला सवाल
- भिवंडीतील कोसळलेल्या इमारतीचा मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात