GST Collection : एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलनाने रचला इतिहास, तब्बल 1.87 लाख कोटींची वसुली!

मागील वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत 12 टक्के जास्त जीएसटी संकलन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एप्रिल 2023 मधील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने इतिहास रचला आहे. जीएसटी संकलनाचे आकडे समोर आले असून, त्यानुसार एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1.87 लाख कोटी रुपये झाले आहे, जो आतापर्यंतचा ऐतिहासिक विक्रम आहे.  GST revenue collection for April 2023 highest ever at 1.87 lakh crore

मार्च 2023 मध्ये देशातील जीएसटी संकलन 1,60,122 कोटी रुपये होते. गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,67,540 कोटी रुपये होते. म्हणजेच गेल्या एप्रिलच्या तुलनेत या एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात 19,495 कोटी रुपये अधिक जीएसटी जमा झाला आहे.

जीएसटी संकलनाचा डेटा जारी करताना, अर्थ मंत्रालयाने सांगितले की एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत 12 टक्के जास्त आहे. 20 एप्रिल 2023 रोजी एका दिवसात 9.8 लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात 68,228 कोटी रुपयांचा GST जमा झाला आहे.

आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एकूण 1,87,035 कोटींच्या GST संकलनात CGST संकलन 38,440 कोटी रुपये, SGST संकलन 47,412 कोटी रुपये, IGST 89,158 कोटी रुपये आणि उपकर म्हणून 12.025 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

GST revenue collection for April 2023 highest ever at 1.87 lakh crore

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात