” उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’ असल्याने भविष्यात…” आशिष शेलारांनी लगावला टोला!

Uddhav Thakray and Shelar

मुंबईतील बीकेसी मैदानात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवरून साधला आहे निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीकडून सध्या राज्यात विविध ठिकाणी वज्रमूठ सभा घेणे सुरू आहे. आज मुंबईतीली बीकेसीतील एका मैदानावर आज ही वज्रमूठ सभा होणार आहे. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. Ashish Shelars criticism of Uddhav Thackeray over Mahavikas Aghadis meeting in BKC

आशिष शेलार म्हणाले, ‘’जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते. एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते. अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होते आहे.  ही वज्रमुठ? मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे! शिवाजी पार्क सोडले, बिकेसीतील मोठी मैदाने घेणे आता टाळले. उबाठाचा प्रवास “ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे” असल्याने भविष्यात नरे पार्कातच सभा होतील असे वाटतेय!’’

आशिष शेलार यांनी ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत म्हटले की, ‘’महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईत होत आहे. मूठभर मैदान आणि मूठभर संख्या आवाज मात्र मोठा. मैदान छोटे, आकडे खोटे आणि त्या ठिकाणचे संजय राऊतांचे भोंगे मोठे. यापेक्षा दुसरं काहीच नाही. ग्राहकउपयोगी वस्तूंना सुद्धा जे मैदान छोटं पडतं. आमच्या भाजपाच्या सभांसाठी ज्या मोठ्या मैदानात झाल्या त्यासाठी जे छोटं मैदान व्यवस्था म्हणून वापरलं, त्या ठिकाणी ही सभा होते आहे.’’

याचबरोबर ‘’उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रगती शिवाजीपार्क, शिवतीर्थावरून बीकेसीच्या मोठ्या मैदानातून आता बीकेसीच्या छोट्या मैदानापर्यंत आली. ईश्वरनिष्ठा बदलून जेव्हा कम्युनिस्टांपर्यंत जायला लागल्या, त्यावेळी आता नरे पार्कपर्यंतच सभा घेण्याची व्यवस्था आणि ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि महाराष्ट्र विकास आघाडीची राहिली आहे. त्यामुळे आवाज मोठा असला तरी, लोक जमवण्यात सपशेल फेल ठरणारी ही सभा छोटं मैदान घेऊन मोठी संख्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीला मुंबईत जनसमर्थनच नाही. त्यामुळेच छोटं मैदान घ्यावं लागलं, असा जनतेचा समज आहे.’’ अशा शब्दांमध्ये आशिष शेलारांनी निशाणा साधला आहे.

Ashish Shelars criticism of Uddhav Thackeray over Mahavikas Aghadis meeting in BKC

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात