Gangster Act Case : राहुल गांधींनंतर आता बसपा खासदार अफजल अन्सारीचेही संसद सदस्यत्व रद्द होणार!

गाझीपूरच्या  ‘एमपी-एमएलए’ कोर्टाने  चार वर्षांची शिक्षा सुनावत एक लाखाचा दंडही ठोठवला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गाझीपूरच्या  ‘एमपी-एमएलए’ कोर्टाने बसपा खासदार अफजल अन्सारी यास गँगस्टर कायद्यात दोषी ठरवले असून, चार वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यासह त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. Afzal Ansaris membership of parliament will be cancelled the court sentenced him to 4 years in the gangster law case

बसपा खासदार अफजल अन्सारी यांच्या विरोधात गँगस्टर कायद्यांतर्गत सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 1 एप्रिल रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. 2007 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात बांदा कारागृहात बंद असलेले मुख्तार अन्सारी आणि त्याचा खासदार भाऊ अफजल अन्सारी आरोपी होते. यापूर्वी न्यायालयाने मुख्तार अन्सारीला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून त्याला 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

संसद सदस्यत्व निश्चित –

जर एखाद्या खासदाराला दोन वर्षे किंवा दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचे खासदारपद जाणे निश्चित आहे. सध्या अफजल अन्सारी हे गाझीपूरचे खासदार असून ते बसपाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. 29 नोव्हेंबर 2005 रोजी मोहम्मदाबादमधील भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या खून प्रकरणात मुख्तार अन्सारी आणि त्याचा भाऊ अफजल यांना आरोपी करण्यात आले होते.

22 नोव्हेंबर 2007 रोजी या हत्येप्रकरणी गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद कोतवाली येथील गँगस्टर चार्टमध्ये खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांचा समावेश करत गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर, 23 सप्टेंबर 2022 रोजी दोघांविरुद्ध प्रथमदर्शनी आरोप निश्चित करण्यात आले आणि फिर्यादीची साक्ष पूर्ण झाली.


Gangster Act Case : मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, पाच लाखांचा दंड; गाझीपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टाचा निकाल


दुसरीकडे, मुख्तार अन्सारीच्या शिक्षेवर भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे की, अतिक-मुख्तार समांतर सरकार चालवत होते. पूर्वी न्यायालय सुनावणी घेण्यापासून मागे हटायचे, आज माफियांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे.

Afzal Ansaris membership of parliament will be cancelled the court sentenced him to 4 years in the gangster law case

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात