काँग्रेसने मला 91 वेळा शिव्या दिल्या, कर्नाटकची जनता मतदानातून काँग्रेसला धडा शिकवेल; मोदींचा इशारा

वृत्तसंस्था

हुमणाबाद : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विषारी साप, अशी अश्लाघ्य टीका केली. त्यानंतर देशात मोठा राजकीय गदारोळ उठला. आज काँग्रेसच्या या शिवीगाळीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक मधील हुमनाबादच्या प्रचार सभेत प्रत्युत्तर दिले आहे. People of Karnataka will teach Congress a lesson by voting; Modi’s warning

काँग्रेसने मला 91 वेळा शिव्या दिल्या. ते वारंवार अशाच सगळ्या समाजांना शिव्या देत सुटले आहेत. कर्नाटक मधली जनता या शिव्यांना मतदानाद्वारे प्रत्युत्तर देईल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

काँग्रेस आतापर्यंत मला 91 वेळा शिव्या देऊन आपला वेळ शिव्यांच्या डिक्शनरीत घालवला. तो वेळ त्यांनी चांगले शासन देण्यात घालवला असता तर काँग्रेसची एवढी दुर्दशा झाली नसती. काँग्रेस नेत्यांनी पूर्वी चौकीदार चोर आहे, मोदी चोर आहे सगळा ओबीसी समाज चोर आहे, अशा शिव्या दिल्या. कर्नाटकात आता त्यांनी लिंगायत समाजालाही चोर म्हटले आहे. सगळ्या समाजांना काँग्रेसने दुखावून ठेवले आहे. कर्नाटकची जनता काँग्रेसच्या या शिवीगाळीला मतदान यंत्राद्वारे चोख प्रत्युत्तर देईल, अशा कठोर शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या नेत्यांवर शरसंधान साधले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख विषारी साप असा केला होता. त्यानंतर देशभरात उठलेल्या राजकीय गदारोळानंतर आपल्याला कोणावरही व्यक्तिगत टीका करायची नसल्याची मखलाशी खर्गे यांनी केली होती. पण त्यातूनही काँग्रेस विरुद्धचा राग शमला नाही.

हुमणाबादमध्ये आजच्या सभेत मोदींनी काँग्रेसने दिलेल्या शिव्यांचा उल्लेख करून त्या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेसने मोदींना दिलेल्या शिव्यांची एक यादीच सोशल मीडियावर फिरत आहे. त्या यादीचा मोदींनी आपल्या भाषणात संदर्भ देऊन काँग्रेसवर शरसंधान साधले आहे.

People of Karnataka will teach Congress a lesson by voting; Modi’s warning

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub