सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली…! असा टोलाही बावनकुळेंनी ठाकरेंना लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
कोराडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज पुन्हा एकदा निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे बारसू रिफायनरील करत असलेल्या विरोधावरून बावनकुळे यांनी टीका केली आहे. शिवाय, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सक्षमपणे काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘’महाराष्ट्राने असे मुख्यमंत्री बघितले आहेत, ज्यांच्या खिशाला अडीच वर्षे पेनच नव्हता. आमदारांच्या पत्रावर सह्या होत नव्हत्या. मात्र, शिंदे व फडणवीस हे रस्त्यावर भेटेल तेथे जनतेचे व कार्यकर्त्यांचे समाधान करतात. केंद्र आणि राज्याचा योग्य समन्वय आहे. डबल इंजिन सरकार आहे, योग्य पद्धतीने काम करत आहे.’’
LIVE |📍 कोराडी | माध्यमांशी संवाद https://t.co/NcQVxLX4Yn — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 28, 2023
LIVE |📍 कोराडी | माध्यमांशी संवाद https://t.co/NcQVxLX4Yn
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 28, 2023
याचबरोबर बारसू रिफायनरी प्रकल्पास होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधतना, बावनकळे म्हणाले, ‘’सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ उद्धव ठाकरे यांनीच बारसूच्या जागेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर आता राजकारण करणे योग्य नाही. आता त्यांना एका भूमिकेवर थांबता येत नाही. त्यांनीच घोषणा केली होती की नाणारला नको बारसू येथे निश्चित केलं आहे. सत्ता गेली मात्र अजूनही सत्तेचा बाणा गेला नाही. जनतें ऐकलंच पाहिजे, परंतु तिथे जाऊन राजकारण करणे योग्य नाही. हा प्रकल्प जनतेला समजावून त्यांचं हीत जोपासून केला पाहिजे. आता ते म्हणता तेव्हा सरकारमध्ये होतो म्हणून ती भूमिका होती, आता विरोधी पक्षात आहे म्हणून ही भूमिका आहे. म्हणजेच काय त्यांची अशी निश्चित भूमिकाच नाही. सध्या ते गडबडलेल्या अवस्थेत आहेत.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App