प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची याची यानिमित्ताने सुरू झाली आहे. In another political earthquake, all 13 MLAs of the Thackeray faction are in touch with Eknath Shinde-Uday Samant
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सावंत म्हणाले. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधल्यानंतर हा दावा केला. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.
काय म्हणाले सामंत?
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 14 भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवणार. त्यांच्यावर भाजपचे हायकमांड नाराज आहे, असा प्रश्न उदय सामंत यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व तेरा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस आमदार संपर्कात आहेत. काँग्रेसचे अनेक बडे नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात तोडफोडीचे राजकारण रंगणार का, असा सवाल निर्माण केला जात आहे.
राऊत विद्वानांचे महामेरू
उदय सामंत यांनी संजय राऊत हे विद्वानांचे महामेरू आहेत, असे म्हणत त्यांचा समाचार घेतला. सामंत म्हणाले की, जगातले सगळ्यात शहाणे आणि विद्वानांमध्ये संजय राऊतांची गणना होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणे सोडून दिले आहे. त्यांसमोर स्पर्धक म्हणून एकही विद्ववान नाही. जगात सगळ्यात जास्त अक्कल राऊतांना आहे. त्यांच्यावर आता काय बोलणार. मात्र, त्यांनी सरकारी कागद दाखवून शहापणा दाखवू नये, असे शब्दांत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App