महाविकास आघाडीत नक्कीच सगळं काही सुरळीत नसल्याचं वारंवार समोर येत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या राजकारणातील मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता आणि लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याच्या भाकीतांवरून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यातच महाविकास आघाडीतही सगळं काही आलबेल नक्कीच नसल्याचंही वारंवार दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांचे नेते विविध विधान करत असून, ज्यावरून महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत साशंकता दिसून येत आहे. BJP spokesperson Keshav Upadhye criticism of Congress state president Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचंही एक विधान नुकतंच चर्चेत आलं आहे. त्यांनी २०२४मध्ये महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लॅन तयार असल्याचं सांगितलं आहे. यावरून भाजपाने त्यांना टोला लगावला आहे.
‘’बाजारात तुरी नावाची म्हण आहे. कशात काही नाही नुसत्याच गप्पा असा त्याचा अर्थ. एकीकडे वज्रमूठ सभेच्या नावाखाली एकत्र असल्याचा कांगावा सुरू असताना, आतून आघाडी झाली नाही तर काय ह्याचा प्लॅन सुरू आहे आणि मुख्यमंत्री पदावरून आत्तापासून भांडणं सुरू झाली. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचं काय झालं? युती ही विचारांनी होत असते, राजकीय हव्यासापोटी झालेली युती किती टिकते हे सगळ्यांनी अनेक वेळा पाहिलंय.‘’ असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.
नाना पटोलेंनी नेमकं काय म्हटलं आहे? –
‘’निवडणूक झाल्यानंतर ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होईल. आमचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचा आहे. मात्र जर २०२४ला महाविकास आघाडी झाली नाही तर काँग्रेसचा प्लॅन तयार आहे.’’ असं नाना पटोले म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App