प्रतिनिधी
बेंगलोर : नरेंद्र मोदींना काँग्रेसने किती आणि कोणत्या शिव्या दिल्या आहेत आणि त्याचे काँग्रेसला नुकसान किती झाले आहे?, याची मोजदाद करणे ही कठीण होऊन बसले आहे. कारण “मौत के सौदागर” पासून सुरु झालेली शिवीगाळ आता विषारी सापापर्यंत येऊन ठेपली आहे.Now Congress Presidnet Kharge calls Prime Minister Modi ‘poisonous snake’…
2007 च्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुजरातच्या अहमदाबाद मधल्या मोटेरा स्टेडियम मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना “मौत के सौदागर” असे संबोधले होते. त्याचा गुजरात मध्ये एवढा परिणाम झाला की त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने जबरदस्त मार खाल्ला. काँग्रेस कायमची सत्तेबाहेर गेली आणि गुजरात मध्ये नेहमीच भाजप सत्तेवर यायला सुरुवात झाली.
सोनिया गांधींचे ते “मौत के सौदागर” हे वक्तव्य कमी होते म्हणून की काय?, काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्यापुढे जाऊन कर्नाटकातल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदींचा उल्लेख “विषारी साप” असा केला आहे. नरेंद्र मोदी हे एखाद्या विषारी सापासारखे आहेत त्यांचे विष चाखायचा प्रयत्न करू नका. ते चाखलेत तर तुम्ही मराल!!, अशी अश्लाघ्य टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एका जाहीर सभेत केली आहे. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्यात त्यांनी सोनिया गांधींच्या “मौत ते सौदागर” या उद्गारांचीही आठवण करून दिली आहे.
पण सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे हे दोघेच काँग्रेस नेते नाहीत, की ज्यांनी मोदींवर अशी अश्लाघ्य टीका केली आहे. त्यांच्या खेरीज सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींना चहावाला, नीच अशा शब्दांनी हिणवले होते. इतकेच नाही तर काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनीच “मोदी तेरी कबर खुदेगी”, अशा घोषणाही दिल्या होत्या. त्याचाही दुष्परिणाम काँग्रेसच्या यशावर झाला.
आता तर थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मोदींना “विषारी साप” म्हणून बसले आहेत. भाजपच्या हातात त्यांनी आयते राजकीय कोलित दिले आहे. त्याचा परिणाम कर्नाटक मधल्या काँग्रेसला भोगावा लागल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा देशभरातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App