ज्ञानपीठ प्राप्त भालचंद्र नेमाडे यांचे मोठे विधान, अकबर हिंदू होता, ताजमहाल बांधणाऱ्याची आई हिंदू होती!!

प्रतिनिधी

मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी “मुघल सम्राट अकबर हिंदू होते,” असे वक्तव्य केले आहे. हे सांगतानाच त्यांनी आपल्याकडे नैतिकता म्हणजे धर्म असेही नमूद केले. अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक ‘हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणायचे, असंही त्यांनी सांगितले. मंगळवारी ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.A great statement by Jnanpith recipient Bhalchandra Nemade, Akbar was a Hindu, the mother of the builder of Taj Mahal was a Hindu

नेमाडे पुढे म्हणाले, “आपल्याकडे धर्म म्हणजे तुमची नैतिकता होय. नैतिकतेला धर्म म्हटलं जात होतं. खानेसुमारीपासून ख्रिश्चन, मुस्लिम असे धर्म सुरू झाले. त्याआधी आपल्याकडे असे धर्म नव्हते. आपण वारकरी होतो, लिंगायत होतो, कुणाची बायको महानुभाव असायची, कुणी वारकरी असायचं, नाथ संप्रदायी असायचे, कुणी बौद्ध असायचे. आपल्याकडे अनेक सरमिसळी होत गेल्या. धर्म असा आपल्याकडे कधी नव्हता.



ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे हिंदू असणं म्हणजे सिंधू नदीच्या अलिकडचे सर्व लोक म्हणजे हिंदू होते. अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक ‘हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणायचे. कारण अकबरसह सगळे हिंदूच होते. ताजमहाल बांधणाऱ्याची आई हिंदू होती. हे आपण मान्य केलं पाहिजे की, आपण सगळे एकच आहोत.”

‘द्वेष पसरवल्याने भारताची फाळणी’

ते पुढे म्हणाले, “दुर्दैवाने मधल्या काळात हा वेगळा, तो वेगळा असं झालं. एकमेकात द्वेष पसरवण्याचं काम झालं. म्हणूनच आपल्या भारत देशाची फाळणी झाली. त्यातून नुकसान झालं. पाकिस्तानचे लोक युद्धावर आर्थिक खर्च करतात, आपणही खर्च करतो. दोघांचंही नुकसान होत आहे. हे या धर्म कल्पनेमुळे झालं.”

धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना नष्ट व्हाव्यात

“आता धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना नष्ट केल्या पाहिजे. त्या ठिकाणी नैतिकता आणि देश ठेवलं पाहिजे. धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना नष्ट केल्या, तरच आपल्यासह संपूर्ण जगाची सुटका होईल. अन्यथा कठीण आहे,” असंही भालचंद्र नेमाडेंनी नमूद केलं.

A great statement by Jnanpith recipient Bhalchandra Nemade, Akbar was a Hindu, the mother of the builder of Taj Mahal was a Hindu

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात