प्रतिनिधी
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठे बॅनर्स लावले. त्यानंतर मराठी माध्यमांनी उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यात सिल्वर ओक मध्ये झालेल्या चर्चेचे वेगवेगळे अर्थ लावत काही बातम्या “फोडल्या”. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आणि तो राष्ट्रवादीला बहाल केला असा दावा केला. पण या दाव्यावर खुद्द शरद पवारांनी मात्र पाणी फेरले आहे. Sharad Pawar targets media over change of leadership in maharashtra, termed it as a table news
शरद पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद सोडले आणि ते राष्ट्रवादीला दिले ही बातमी म्हणजे “टेबल न्यूज” असल्याचा टोला पत्रकारांनाच हाणला आहे. सिल्वर ओक मध्ये उद्धव ठाकरेंशी मुख्यमंत्री पदाबाबत माझी कोणतीही चर्चाच झाली नाही. ती बातमी तुम्हीच कुठल्यातरी सोर्स मधून दिली आहे. पण ती “टेबल न्यूज” आहे, असे शरद पवार पत्रकारांना म्हणाले.
Sharad Pawar : “सिल्वर ओक”वर दगड – चप्पल फेक – एसटी कर्मचारी – राऊत – “मातोश्री” व्हाया राष्ट्रवादी…!!; हल्ल्याची वळणे आणि “वळसे”!!
संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा संदर्भात गेले दोन-तीन दिवस वेगवेगळे दावे केले आहेत. संजय राऊत हे संपादक असल्याने त्यांना दिल्लीतल्या कुठल्या वेगळ्या सोर्सेस मधून माहिती मिळत असेल. पण मला मात्र त्याची माहिती नाही, असे सांगून संजय राऊत यांच्या दाव्यामधली हवा देखील शरद पवारांनी काढून टाकली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचे नेतृत्व नाराज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल होणार आहे. दिल्लीत त्या संदर्भात काही राजकीय घडामोडी शिजत आहेत, असा तथाकथित गौप्यस्पोट संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नागपूर दौरा ठरला आहे. त्यामुळे नागपूर दौऱ्यात देखील अमित शाह आशा काही राजकीय हालचाली करतील की ज्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आसन अस्थिर होईल, असा दावाही मराठी माध्यमांनी चालवला आहे. पण या सर्व दाव्यांमधली हवा शरद पवारांनी “टेबल न्यूज” या दोन शब्दांमधून काढून टाकली आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App