प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत 1 मे रोजी होण्यापूर्वीच आघाडीतल्या वज्रमुठीची बोटे नुसती सैलावली नाहीत, तर आता मूठ पूर्ण ढिल्ली पडल्याचे स्पष्ट होत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस मधली मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. मात्र या महत्त्वाकांक्षेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टाचणी लावली आहे.Nana patole punctured NCP ambitions of chief ministership of maharashtra
महाविकास आघाडी टिकलीच तरी ज्या पक्षाच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री, अशा स्पष्ट शब्दांत नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेला काटशह दिला आहे. त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडी टिकवून धरण्यासाठी काँग्रेसचा भर आहे, पण ती टिकली नाही तर काँग्रेसचा दुसरा प्लॅन तयार आहे, असे स्पष्ट सांगून महाविकास आघाडीला केव्हाही सुरू लागतो लागू शकतो असे ठळकपणे सूचित केले आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेस अस्वस्थ झाले आहेत. यापैकी शिवसेनेच्या ठाकरे गटाने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडून तो राष्ट्रवादीला बहाल केला असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात ठाकरे गटाची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया पुढे आलेली नाही.
मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट शब्दांत त्या संदर्भात खुलासा केला आहे, तो म्हणजे महाविकास आघाडी टिकली तर ज्या पक्षाच्या जागा जास्त म्हणजे ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, हा तो खुलासा होय. त्यामुळे नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षेला काँग्रेसकडून स्पष्ट शब्दांत छेद दिल्याचे मानण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App