दादरा आणि नगर हवेलीला पंतप्रधान मोदींनी दिली पाच हजार कोटींच्या योजनांची भेट

प्रधानमंत्री आवास योजनेतील काही लाभार्थ्यांना घराच्या चाव्या दिल्या.

विशेष प्रतिनिधी

दादरा आणि नगर हवेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दादरा आणि नगर हवेलीला पाच हजार कोटी रुपयांच्या योजनांची भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासा येथील नमो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चला भेट दिली आणि संस्था राष्ट्राला समर्पित केली. Prime Minister Modi gifted schemes worth five thousand crores to Dadra and Nagar Haveli

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासा येथे आयोजित कार्यक्रमात सुमारे 4,873 कोटी खर्चाच्या ९६ प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री आवास योजनेतील काही लाभार्थ्यांना घराच्या चाव्या दिल्या.

एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले ‘’इतक्या छोट्या भागात चारही दिशांना आधुनिक विकास कसा होतो याची कोणीही कल्पना करू शकत नाही, हे आम्ही पाहिले आहे. आता आपला सिल्वासा पूर्वीसारखा राहिला नाही, तो आता कॉस्मोपॉलिटन झाला आहे. भारतातील असा एकही कोपरा नसेल जिथले लोक सिल्वासामध्ये राहत नाहीत.’’

याशिवाय ‘’आज मला पुन्हा सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. आज उद्घाटन झालेल्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्याची संधी तुम्ही मला दिली होती. स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली, पण दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये एकही वैद्यकीय महाविद्यालय बांधले गेले नाही. अनेक दशके देशावर राज्य करणाऱ्यांना इथल्या तरुणांवर होणाऱ्या अन्यायाची कधीच फिकीर नव्हती.’’

Prime Minister Modi gifted schemes worth five thousand crores to Dadra and Nagar Haveli

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात