Delhi Liquor Policy Case : मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार! मद्य धोरण प्रकरणी CBIच्या आरोपपत्रात प्रथमच आले नाव

Manish Sisodia

आरोपपत्रातील मुद्यांवर युक्तिवादासाठी न्यायालयाने १२ मे ही तारीख निश्चित केली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने मंगळवारी (२५ एप्रिल) राऊस एव्हेन्यू कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बुची बाबू, अर्जुन पांडे आणि अमनदीप धल्ल यांना आरोपी करण्यात आले आहे. यापूर्वी कोणत्याही आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव नव्हते. आरोपपत्रातील मुद्यांवर युक्तिवादासाठी न्यायालयाने १२ मे ही तारीख निश्चित केली आहे. Delhi Liquor Policy Case Manish Sisodias problems will increase For the first time the name appeared in the CBIs chargesheet

खरं तर, सीबीआय मद्य धोरणातील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे. या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणेने २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक केली होती. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबतही ईडी सिसोदिया यांची चौकशी करत असून, सिसोदिया हे उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करत आहे.

दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणात मद्य विक्रेत्या व्यापाऱ्यांना परवाना देण्यासाठी काही डीलर्सना फायदा पोहचवल्या गेल्याचा आरोप आहे. ज्यांनी कथितरित्या यासाठी लाच होती. गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने या प्रकरणी सुमारे नऊ तास चौकशी केली होती. तर मद्य धोरण प्रकरण बनावट असल्याचे वर्णन करताना केजरीवाल म्हणाले होते की, केंद्र आम आदमी पक्षाला लक्ष्य करत आहे कारण तो राष्ट्रीय पक्ष बनला आहे.

Delhi Liquor Policy Case Manish Sisodias problems will increase For the first time the name appeared in the CBIs chargesheet

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात