केरळ दौऱ्यापूर्वी PM मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे पत्र, पोलीस तपास सुरू

वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलपासून केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात पंतप्रधानांच्या कार्यक्रमादरम्यान मानवी बॉम्बने आत्मघाती हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्र मल्याळममध्ये लिहिले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींची अवस्था माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखी होईल, असे म्हटले आहे.Letter threatening to bomb PM Modi ahead of Kerala visit, police investigation underway

21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली होती.



पोलिस तपास सुरू

एडीजीपी (इंटेलिजन्स) यांचा अहवाल प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर धमकीच्या पत्राची बातमी आज समोर आली. ही बातमी समोर येताच सुरेंद्रन यांनी प्रसारमाध्यमांची भेट घेतली आणि सांगितले की, त्यांनी आठवड्यापूर्वी राज्याच्या पोलिस प्रमुखांना धमकीचे पत्र सुपूर्द केले होते.

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पत्रात नाव आणि पत्ताही लिहिला आहे. पोलिसांनी तत्काळ त्या पत्त्यावर छापा टाकला. हे पत्र कोचीचे रहिवासी असलेल्या एनजे जॉनी या नावाने लिहिले आहे. पोलिसांनी सांगितले की, जॉनीने या पत्राबाबत कोणतीही माहिती असल्याचे नाकारले.

गुप्तचर अहवाल लीक करून पोलिसांनी गंभीर चूक केली असून त्याची चौकशी व्हायला हवी, असा आरोपही सुरेंद्रन यांनी केला. एक गुप्तचर अहवाल लीक झाला आहे. 49 पानांच्या या अहवालात कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची नावे, त्यांची भूमिका, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा तपशीलवार तक्ता आणि इतर बाबी देण्यात आल्या आहेत.

Letter threatening to bomb PM Modi ahead of Kerala visit, police investigation underway

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात