अक्षय्यतृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी हजारो आंब्यांची आरास

  • ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये होणार आंब्यांच्या प्रसादाचे वाटप

विशेष प्रतिनिधी

पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी पुणेकरांचं लाडकं दैवत श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पााला तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.On The Occasion Of Akshatruthiya The Dagdusheth Halwai Trust Celebrate Alphonso Mango Festival

यानिमित्त लाडक्या गणपती बाप्पांच्या सभोवताली आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्त गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्याचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्यावतीने हा महानैवेद्य देण्यात आला.आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

https://fb.watch/k3wfQifnYE/?mibextid=YCRy0i

यापूर्वी पहाटे ४ ते सकाळी ६ पर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता विशेष गणेशयाग आणि विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन झाले. आंब्यांचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.

On The Occasion Of Akshatruthiya The Dagdusheth Halwai Trust Celebrate Alphonso Mango Festival

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात