प्रतिनिधी
नवी दिल्ली : आधीच संजय राऊत यांचा शिंदे गटाल्या आमदारांची उभा दावा आहे. शिवसेनेतल्या फुटीला उद्धव ठाकरेंची वर्तणूक जशी कारणीभूत आहे, तशीच संजय राऊत यांचे रोजची पत्रकार परिषदही कारणीभूतच ठरली, असा आरोप शिंदे गटातल्या बहुसंख्य आमदारांनी केला आहे. त्यात काल अजितदादांची भर पडल्यानंतर आज संजय राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार करत अजितदादांशीही उभा दावा घेतला आहे.
तुमचे मुखपत्र आहे. त्या पक्षाविषयी बोला. इतर पक्षांची वकिली करू नका, असे अजितदादांनी कालच संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना सुनावले होते. त्यावर आज संजय राऊत आपल्या नियमित पत्रकार परिषदेत अजितदादांवर बरसले. मी काय खोटे लिहिले आहे? जे लिहिले ते सत्यच आहे. केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणून त्यांनी शिवसेना तोडली. राष्ट्रवादीवर प्रहार करताहेत. हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल यांना जाऊन विचारा, त्यांच्यावर दबाव आहे का नाही?? तेच तर मी लिहिले आहे. मग ते कुणाला टोचत असेल त्याला मी काय करणार?? मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी फक्त शरद पवारांच्या ऐकतो. बाकीच्यांचे ऐकायचे कारण काय??, असे परखड प्रत्युत्तर संजय राऊत यांनी अजितदादांचे नाव न घेता दिले.
यामुळे अर्थातच महाविकास आघाडीत वादाचे नवी ठिणगी पडली आहे. महाविकास आघाडीच्या फक्त दोन वज्रमूठ सभा पार पडल्या तर ही अवस्था आली आहे. अजून 6 सभा पार पाडायच्या आहेत. त्यातली मुंबईतली बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधली सभा महत्त्वाची आहे आणि ती 1 मे रोजी व्हायची आहे. त्या आधीच अजितदादा विरुद्ध संजय राऊत अशी राजकीय कुस्ती जुंपली आहे.
एकीकडे अजितदादांचे कथित बंड शरद पवारांनी चाणक्यगिरी करून कसे शमविले, आमदारांना व्यक्तिगत पातळीवर फोन करून त्यांच्याशी पवार कसे बोलले त्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिले आहेत, तर दुसरीकडे अजितदादा विरुद्ध संजय राऊत अशी नवी राजकीय कुस्ती जुंपल्याने महाविकास आघाडीला तडा जाण्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App