उत्तर कोरियाने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, जपानमध्ये खळबळ, नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना

वृत्तसंस्था

टोकियो : अमेरिका आणि दक्षिण कोरियासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने गुरुवारी एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले जे जपान आणि कोरियन द्वीपकल्पातील पाण्यात पडले. यानंतर जपानने बेटावर राहणाऱ्या लोकांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. तथापि, क्षेपणास्त्र बेटाच्या जवळ पडेल असा आपत्कालीन चेतावणी यंत्रणेने चुकीचा अंदाज वर्तवला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याने हा आदेश आता मागे घेण्यात आला आहे.North Korea fires ballistic missile, stirs in Japan, warns citizens to take precautions

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, त्यांचे सरकार या प्रक्षेपणाबाबत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेणार आहे.



जपानचे संरक्षण मंत्री यासुकाझू हमादा यांनी सांगितले की, हे क्षेपणास्त्र पूर्वेकडे हाय अँगलमध्ये डागण्यात आले आहे. ते म्हणाले की, हे क्षेपणास्त्र जपानच्या हद्दीत पडले नाही आणि संरक्षण मंत्रालय अधिक तपशीलांसाठी प्रक्षेपणाचे विश्लेषण करत आहे. त्याचवेळी उत्तर कोरियाच्या पूर्वेला हे क्षेपणास्त्र समुद्रात पडल्याचे जपानच्या तटरक्षक दलाने सांगितले. हमदा म्हणाले की, क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रावरून उडले की नाही याची पुष्टी करू शकत नाही.

त्याचवेळी, दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की, हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग जवळून डागण्यात आले आणि त्याने जपान – कोरियन द्वीपकल्पातील समुद्राच्या दिशेने उड्डाण केले. असोसिएटेड प्रेस (एपी) च्या मते, हे क्षेपणास्त्र मध्यम किंवा लांब पल्ल्याचे मानले जात होते, परंतु त्याने किती अंतरापर्यंत उड्डाण केले हे स्पष्ट झाले नाही.

याच्या काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी आपल्या देशाचे सैन्य अधिक व्यावहारिक आणि आक्रमक पद्धतीने मजबूत करण्याचे आवाहन केले होते. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की, प्योंगयांगजवळून सकाळी 7.23 वाजता (22.23 जीएमटी बुधवारी म्हणजे गुरुवारी पहाटे 3.53 वाजता) क्षेपणास्त्र डागण्यात आले. दक्षिण कोरियाच्या सैन्याने सांगितले की, ते हाय अलर्टवर आहेत आणि अमेरिकेशी जवळून समन्वय साधत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त लष्करी कवायतींवर उत्तर कोरियाने टीका केलेली आहे.

North Korea fires ballistic missile, stirs in Japan, warns citizens to take precautions

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात