नऊ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील करोना संसर्ग पुन्हा एकदा हळूहळू वाढताना दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, हरियणासह काही राज्यांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मार्गदर्शकतत्वे जारी करून, उपाययोजनासंदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहेत. Maharashtra reports 1115 new COVID19 cases 560 recoveries and 9 deaths in the last 24 hours
दरम्यान महाराष्ट्रात मागील २४ तासांत १ हजार ११५ नवीन करोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ५६० रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यामुळे आजपर्यंत राज्यात करोनातून बरे झालेल्यांची संख्या ७९,९८,४०० झाली असून, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. याचबरोबर मृत्यू दर हा १.८२ टक्के आहे. तसेच, ८,६७,४०,१४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,५२,२९१ नमूने(०९.४० टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Maharashtra reports 1115 new #COVID19 cases, 560 recoveries and 9 deaths in the last 24 hours. Active cases 5421 pic.twitter.com/pVNyDp3LED — ANI (@ANI) April 12, 2023
Maharashtra reports 1115 new #COVID19 cases, 560 recoveries and 9 deaths in the last 24 hours.
Active cases 5421 pic.twitter.com/pVNyDp3LED
— ANI (@ANI) April 12, 2023
मुंबईत सर्वाधिक रूग्ण –
बीएमसीने जारी केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार, मुंबईत करोना संसर्गाची ३२० नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. उपचारानंतर एका दिवसात २१९ रुग्ण बरेही झाले आहेत. त्याचवेळी दोघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत सर्वाधिक १५७७ सक्रिय रुग्ण आहेत. त्याच वेळी, एका दिवसात ५६० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामधून बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट ९८.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत ठाणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे ९५३ सक्रिय रुग्ण आहेत. पालघरमध्ये १६०आणि रायगडमध्ये २३७सक्रिय रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App