विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सावरकर आणि अदानी या दोन मुद्द्यांवर काँग्रेसला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यात सावरकर मुद्द्याबाबत पवारांना यश आले. पण अदानी मुद्द्यावर मात्र ते साफ अपयशी ठरल्याचे दिसत आहे. कारण राहुल गांधींनी सध्या तरी सावरकर मुद्दा सोडला असला तरी, अदानी मुद्दा सोडलेला नाही हेच त्यांच्या नव्या ट्विटने सिद्ध केले आहे.Rahul Gandhi tweeted word puzzle against adani but it is cancel or minus politics of rahul himself
राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडलवर एक शब्दकोडे ट्विट केले आहे. या शब्दकोड्यातून त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावे गुंफून त्यातून “अदानी” शब्द कसा तयार होतो, हे दाखवून दिले आहे. राहुल गांधींची ही शब्दकोडेची युक्ती अनेकांना आवडली आहे, तर अनेकांनी त्यावरून राहुल गांधींना ट्रोल केले आहे. पण राहुल गांधींनी जे शब्दकोडे ट्विट केले आहे, त्यात जी नावे त्यांनी गुंफली आहेत ती पाहिली तर त्यातून अदानी शब्द तयार होतो हे खरेच. पण ते शब्दकोडे तेवढ्यापुरतेच मर्यादित आहे की त्या पलिकडे देखील त्याचा काही राजकीय अर्थ आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे आणि शब्दकोड्यांमधील शाब्दिक खेळापेक्षा तो राजकीय अर्थ जास्त महत्त्वाचा आहे!!
राहुल गांधींनी ट्विट केलेल्या शब्दकोड्यामध्ये गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमांता विश्वशर्मा आणि अनिल अँटनी यांची नावे गुंफली आहेत. यात सिंधिया हे फक्त आडनाव आहे. बाकी सगळ्यांची गुलाम, किरण, हिमांता आणि अनिल अशी नावे आहेत. या नावांच्या विशिष्ट अक्षरांमधून “अदानी” शब्द तयार होतो हे खरे, पण त्या पलिकडे याचा राजकीय अर्थ असा की खुद्द राहुल गांधींमुळेच किंवा त्यांच्या राजकीय कर्तृत्वामुळेच वर उल्लेख केलेले सर्व नेते काँग्रेस पासून बाजूला गेले आहेत!!, हा आहे.
सच्चाई छुपाते हैं, इसलिए रोज़ भटकाते हैं! सवाल वही है – अडानी की कंपनियों में ₹20,000 करोड़ बेनामी पैसे किसके हैं? pic.twitter.com/AiL1iYPjcx — Rahul Gandhi (@RahulGandhi) April 8, 2023
सच्चाई छुपाते हैं, इसलिए रोज़ भटकाते हैं!
सवाल वही है – अडानी की कंपनियों में ₹20,000 करोड़ बेनामी पैसे किसके हैं? pic.twitter.com/AiL1iYPjcx
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 8, 2023
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस हायकमांडला वारंवार इशारे दिले होते. पण हायकमांडने त्यांचे ऐकले नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील काँग्रेसला विशेषतः राहुल गांधींना काही सल्ले दिले होते. पक्षाच्या संघटनात्मक सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. पण अखेर त्यांनाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता पकडला. हिमांता विश्वशर्मा यांच्या बाबतीत तर सर्वात भयानक अनुभव आला होता. आसाम मधल्या काही घडामोडींची माहिती हिमांता हे राहुल गांधींना देत असताना ते त्यांचे म्हणणे ऐकण्याचे सोडून आपल्या कुत्र्याला बिस्किट भरवत होते. ही माहिती खुद्द हिमांता विश्वशर्मांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगून काँग्रेस सोडली. अनिल अँटनी आणि किरण कुमार रेड्डी यांचीही कहाणी फार वेगळी नाही. किरण कुमार रेड्डी हे तर अखंड आंध्राचे शेवटचे मुख्यमंत्री होते. पण काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर त्यांच्याकडे एवढे दुर्लक्ष केले की ते वाळीत पडल्यासारखे झाले आणि मग त्यांनी भाजपचा रस्ता चोखाळला. अनिल अँटनी हे संरक्षण मंत्री माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव आहेत. ए. के. अँटनी हे काँग्रेस मधले कॉन्शियस कीपर नेते म्हणून ओळखले जातात. ते वृद्ध असल्याने राजकारणापासून दूर आहेत. पण त्यांना स्वतःलाही आपल्या मुलाचे राजकीय भवितव्य काँग्रेसमध्ये ठीक दिसले नाही. म्हणून नव्या राजकीय भवितव्याच्या शोधात अनिल भाजपमध्ये आले आहेत.
राहुल गांधींनी शब्दकोड्यात उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांची ही थोडक्यातली राजकीय कर्मकहाणी आहे. यापैकी प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी राहुल गांधींनी स्वतःच दुखावून ठेवले आहे आणि ते सर्वजण आज काँग्रेस बाहेर गेले आहेत. याचा अर्थ राहुल गांधींनी या नेत्यांची काँग्रेस मधून वजाबाकी केली आहे. भले राहुल गांधींनी शब्दकोड्यातून या नेत्यांचा चतुराईने उल्लेख केला असेल, पण आपणच केलेल्या वजाबाकीचे गणित त्या कोड्यातून सोडवले आहे.
पण सध्या राहुल गांधींच्या डोळ्यावर सावरकर आणि अदानी या दोन नावांचे पडळ आल्याने त्यांना शब्दकोड्यातून आपणच केलेल्या वजाबाकीचे गणित दिसले नसावे किंवा काँग्रेस मधल्या इतर नेत्यांनी ते सांगितले नसावे, इतकेच!!… पण म्हणून काही राजकीय वस्तुस्थिती बदलत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App