टीका टिपण्णी करण्याआधी अदानी – अंबानींचे योगदान पाहा; काँग्रेसच्या प्रतिक्रियेनंतर पवारांनी पुन्हा फटकारले

प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधींनी गौतम अदानींचा मुद्दा लावून धरल्यानंतर शरद पवारांनी एनडीटीव्ही च्या मुलाखतीत अदानींचे समर्थन केले. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, पण त्यानंतरही शरद पवारांनी गौतम अदानींचे समर्थन सुरू ठेवले आहे.Sharad Pawar again targets Congress over adani issue

एनडीटीव्हीच्या मुलाखतीत आपण अदानींवर टीका करू नये, असे म्हटले आहे. त्याला काँग्रेसचा विरोध आहे. या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की अदानींवर टीका करू नये, असे मी म्हटलो नाही. हा आरोप माझ्यावर लादू नका. पण एक जमाना असा होता की सत्ताधारी पक्षावर टीका करताना त्यावेळी टाटा – बिर्लांची नावे घेतली जात असत. आता अदानी अंबानींची नावे घेतली जातात. टाटा – बिर्लांचे या देशाच्या विकासात मोठे योगदान होते, तसेच अदानी – अंबानींचेही योगदान आहे. त्याचा विचार केला पाहिजे एवढेच मी म्हणालो. त्याखेरीज मूळात देशात आता अदानी मुद्द्यापेक्षाही गंभीर अशा तीन समस्या आहेत. बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या मुद्द्यांवर एकत्र येऊन विरोधकांना काहीतरी पर्यायी योजना जनतेसमोर ठेवता आली पाहिजे. ती ठेवण्याचा विरोधकांनी प्रयत्न करावा.



 जेपीसीचा मुद्दा

अदानी प्रकरणात संयुक्त संसदेची संसदीय समितीच्या चौकशीची मागणी सर्व विरोधकांनी केली होती हे खरे आहे. पण त्या समितीमध्ये 21 सदस्य असतात. त्यापैकी जर 15 सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतील तर त्यामधून त्याच्या चौकशीतून कितपत सत्य बाहेर येईल?, याविषयी शंका वाटते एवढेच मी म्हणालो, असा खुलासाही पवारांनी केला आहे.

 काँग्रेसला बॅक फुटवर ढकलण्याचा प्रयत्न

मात्र पवारांच्या आजच्या खुलाशातले हे राजकीय इंगित आहे, की त्यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्यानंतरही अदानींचे समर्थन सुरू ठेवले आहे. त्या पलिकडे जाऊन अदानी मुद्दा देखील सावरकर मुद्द्यासारखा महत्त्वाचा नाही, तर त्यापेक्षा बेरोजगारी महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा काँग्रेसला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी सावरकरांवर टीकास्त्र सोडल्यानंतर सावरकर मुद्द्यावर देखील बोलताना शरद पवारांनी तो राष्ट्रीय मुद्दा नसल्याचे सांगून काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले होते. तसाच प्रकार अदानी मुद्द्यावर करण्याचा पवारांनी प्रयत्न केला आहे.

पवारांच्या शिष्टाईनंतर सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस बॅकफूटवर गेले हे खरे, पण अदानी मुद्द्यावर पवार सांगतील म्हणून काँग्रेस आणि राहुल गांधी माघार घेतली, ही शक्यता किती आहे??, याचे उत्तर नजीकच्या भविष्यकाळात दडले आहे.

Sharad Pawar again targets Congress over adani issue

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात