वृत्तसंस्था
चेन्नई : मोदी आडनाव बदनामीप्रकरणी दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. एवढे सगळे होऊनही अजूनही याविषयावर टोकाच्या प्रतिक्रिया सुरूच आहेत. एकीकडे विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे भाजपही काँग्रेस आणि राहुल गांधींवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. आता तर काँग्रेस नेत्याने थेटपणे राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापण्याची धमकी दिली आहे. I will cut off the tongue, Congress leader Manikandan threatens the judge who sentenced Rahul Gandhi
राहुल गांधींना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याच्या विरोधात तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये काँग्रेस पक्षाच्या एससी/एसटी शाखेने शुक्रवारी निषेध केला. येथे पक्षाचे जिल्हाप्रमुख मणिकंदन यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसची सत्ता आल्यास राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकण्याची धमकी दिली.
वादग्रस्त भाषण देताना मणिकंदन म्हणाले, “23 मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती एच. वर्मा ऐका, जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू.”
दुसरीकडे ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात मणिकंदनविरुद्ध तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच दिंडी उत्तर पोलिसांनी वादग्रस्त विधानांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुरत कोर्टाने राहुल गांधींना सुनावली 2 वर्षांची शिक्षा
13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकमधील एका निवडणूक रॅलीत राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते, ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी… सगळ्यांना एक समान आडनाव का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का? या वक्तव्याबद्दल भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
यावर 23 मार्च रोजी सुरतच्या कोर्टाने राहुलला दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षेची घोषणा करताना न्यायालयाने म्हटले होते, ‘या गुन्ह्याचे गांभीर्यही वाढते कारण हे भाषण एका खासदाराने दिले होते, ज्याचा जनतेवर खोलवर परिणाम होतो.’ त्यांना कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असेही न्यायालयाने म्हटले होते. दोन वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्वही संपले. कायद्यानुसार खासदाराला 2 वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व लगेच संपते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App