रोशनी शिंदे मारहाण : खरा संघर्ष ठाकरे – शिंदे गटात; पण ठाकरे – राष्ट्रवादीच्या टार्गेटवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस!!, फडवीसांचाही पलटवार

प्रतिनिधी

ठाणे : रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात खरा संघर्ष ठाकरे – शिंदे गटात आहे, पण अत्यंत चलाखीने ठाकरे आणि राष्ट्रवादीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. त्यातही उद्धव ठाकरेंनी फडतूस गृहमंत्री असे म्हणत फडणवीसांना डिवचले आहे. त्यावर अर्थातच फडणवीस यांनी देखील जबरदस्त प्रहार केला असून जे मुख्यमंत्री जेलमध्ये गेलेल्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत, सचिन वाझेची ज्यांनी लाळ घोटली ते मला फडतूस गृहमंत्री म्हणत आहेत आणि माझा राजीनामा मागत आहेत. त्यांना तो अधिकार तरी आहे का??, असा सवाल केला आहे. Uddhav Thackeray and NCP targets home minister devendra Fadanavis, but Fadanavis reacts sharply

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांनी ठाण्याच्या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर स्वतः ठाकरे खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांवर जोरदार तोफ डागली. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात फडतूस गृहमंत्री मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातल्या सरकारला नपुंसक म्हटले, त्याची ही प्रचिती आली आहे, अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसनवर घणाघाती टीका केली.

याच टीकेचा पुनरूच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्हा अथवा ठाणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून दाखवावी त्यांना एकनाथ शिंदे यांची परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय ते करू शकणार नाहीत. तसे त्यांनी करून दाखवले तर त्यांची हिंमत मी मानेन, अशा शब्दांत जयंत पाटलांनी त्यांना डिवचले.

मात्र, ठाकरे आणि जयंत पाटलांच्या टीकेनंतर एक पॅटर्न निश्चित समोर आला आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी दोन्ही मिळून एक टार्गेट करण्याचा हा पॅटर्न आहे.

मात्र, फडणवीस यांनी त्याला प्रखर विरोध करून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, की ज्या मुख्यमंत्र्यांनी घरी बसून अडीच वर्षे राज्य केले, त्यांचेच दोन मंत्री जेलमध्ये गेले तरी त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत ते करू शकले नाहीत. सचिन वाझेला पोलीस खात्यात परत घेऊन त्याची लाळ घोटली. ते मुख्यमंत्री मला फडतूस म्हणून माझा राजीनामा मागत आहे, तसा त्यांना अधिकार तरी आहे का? मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. पण गृहमंत्री म्हणून मी कोणत्याही व्यक्तीला जर त्याने चुकीचे काम केले असेल तर जेल मध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या अर्थी ते सगळे लोक माझ्यावर चिडले आहेत त्या अर्थी मी योग्य काम करतो आहे, अशा परखड शब्दांमध्ये फडणवीस यांनी ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray and NCP targets home minister devendra Fadanavis, but Fadanavis reacts sharply

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात