‘वज्रमूठ’ नव्हे, ही तर सोळा चोरांची हातमिळवणी! असा टोलाही लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नुकतीच पार पडली. यासभेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी, भाजपा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. विशेष करून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या टीकेला आता भाजपाकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. BJP MLA Ashish Shelar criticized Uddhav Thackeray
पत्रकारपरिषदेत आशिष शेलार म्हणाले, ‘’भाजपा काय करतोय, तो पक्ष काय करतोय, त्याची धोरणं काय करताय, याच्या कार्यक्रमावर भाष्य करा. अरे तुमचं काय? तुमचं ध्येय, धोरण, विचारधारा काय? याबाबत काही नाही. दुसऱ्याच्या घरात काही झालं तर पेढे वाटायचे आणि स्वत:च्या मनासारखं नाही झालं तर रडत बसायचं. या पलिकडे काहीही कार्यक्रम नसलेला पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि म्हणून या १४५ पक्षांमधला सर्वात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट.’’
”संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचं नसतं” चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!
याचबरोबर ‘’या टवाळांनी परवा सभा घेतली आणि ती सभा घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ. या लोकांना साधंही कळत नाही, की वज्रमूठ एका माणसाची असते, एका ताकदवर माणसाची असते. सोळा जण एकत्र मिळून करतात त्याला हातमिळवणी म्हणतात, वज्रमूठ नव्हे. सोळा चोरांनी मिळून केलेली हातमिळवणी. एका ताकदवार माणासाने केलेली वज्रमूठ. हेही साधं यांना माहीत नाही. त्यामध्ये उद्धव ठाकरे जे इतके वर्षे त्यांच्या पोटात होतं, जे इतके वर्षे आमच्याबरोबर राहून, ज्यांच्या मनातली इच्छा होती ते बोलून चुकले. काय म्हणाले उद्धव ठाकरे भाजपाला नामशेष करू. कोणाला, यांना नामशेष नरेंद्र मोदींना करायचे आहे का, असा आमचा प्रश्न आहे. यांना नामशेष भाजपाला करायचं म्हणजे काय? यांना नामशेष देवेंद्र फडणवीसांना करायचं होतं, यासाठी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा प्रकार उघड झाला. यांना नामशेष अमित शाहांना करायचं आहे का, हा आमचा प्रश्न आहे.’’ असंही शेलार म्हणाले.
Watch Live Now पत्रकारांशी संवाद Facebook :- https://t.co/st94LW0lGH Youtube :- https://t.co/HAVRAVOvPo — ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) April 4, 2023
Watch Live Now
पत्रकारांशी संवाद
Facebook :- https://t.co/st94LW0lGH
Youtube :- https://t.co/HAVRAVOvPo
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) April 4, 2023
याशिवाय ‘’त्यामुळे त्यांना आमचं प्रतिआव्हान आहे, नामुश्कीने तुम्ही जगत आहात उद्धव ठाकरे तुम्ही. नामशेष करण्यासाठी तुम्ही आव्हान दिलं असेल, तर आमचं तुम्हाला प्रतिआव्हान आहे कारण आम्ही केवळ तुमचे विरोधक आहोत. याच महाराष्ट्राच्या मातीत एक औरंगजेब तेव्हा आला होता, जो नामशेष करण्याची भाषा करत होता आणि याच महाराष्ट्रात आता कलियुगात औरंगजेबी स्वप्न उद्धव ठाकरे तुम्ही मांडता, बोलताय, भाषणात सांगताय. राम मंदिर निर्माण कऱणाऱ्यांना नामशेष करायला निघाला आहेत. कलम ३७०, ३५ ए, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग ज्यांनी केला आहे त्यांना नामशेष करायला तुम्ही निघाला आहात.’’ अशा शब्दांमध्ये शेलार यांनी टीका केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App