प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नागपूर मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या केंद्रासंबंधी नितीन गडकरींशी चर्चा केल्याची बातमी आली असतानाच, तिथल्याच पत्रकार क्लब मध्ये घेतलेल्या मिट द प्रेस कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर देखील महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्वातंत्र्य लढ्यातला त्याग, त्यांची सामाजिक पुरोगामी भूमिका आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हे पैलू मानावेच लागतील, अशा शब्दांत शरद पवारांनी राहुल गांधींना पुन्हा एकदा सुनावले आहे. Sharad Pawar targets rahul Gandhi again on savarkar insult issue from nagpur; savarkar was great freedom fighter, social reformist and scientific approach leader, said pawar
महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना – भाजपची सावरकर गौरव यात्रा सुरू होत असताना शरद पवारांनी नागपूर मधून सावरकरांबद्दल सकारात्मक भूमिका मांडणे याला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
सावरकरांच्या राजकीय भूमिकेबद्दल मतभेद असू शकतात. आम्ही लोकांनी देखील त्यांच्या हिंदू महासभेच्या संदर्भातल्या भूमिकेवर टीका केली होती. पण सावरकरांचा स्वातंत्र्य लढ्यातला त्याग, त्यांची सामाजिक भूमिका आणि त्यांनी मांडलेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन या सकारात्मक बाबी मान्य कराव्या लागतील, अशा शब्दांमध्ये त्यांनी शरद पवारांनी राहुल गांधींना सुनावले आहे. सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानत कष्ट भोगले. रत्नागिरीत त्यांनी एक मंदिर बांधले आणि तेथे वाल्मिकी समाजाचा पुजारी ठेवला. हा त्यांचा सामाजिक पुरोगामी दृष्टिकोन होता. त्याचबरोबर त्यांनी गाय ही देवता नसून उपयुक्त पशु आहे, ही भूमिका मांडली. सावरकरांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, असे शरद पवार म्हणाले.
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा करून त्यांचा वारंवार अपमान केला. या मुद्द्यावर शरद पवारांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीत राहुल गांधींना स्पष्ट शब्दात सुनावले होतेच. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी नागपूर मधल्या मिट द प्रेस कार्यक्रमात केला. सावरकर मुद्द्यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींना सुनावल्यामुळे सावरकरांचा मुद्दा महाराष्ट्र सह देशात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
अदानी मुद्द्यावर पवारांचे वेगळे मत
याच मिट द प्रेस कार्यक्रमात शरद पवारांनी अदानी मुद्द्यावर देखील महत्त्वपूर्ण भाष्य केले. काँग्रेस पक्ष अदानी आणि मोदी संबंधांविरोधात देशभर आंदोलन करत आहे. राहुल गांधींनी अदानींकडे 20000 कोटी रुपयांची गुंतवणूक कुठून आली?, असा सवाल उपस्थित केला आहे. या मुद्द्यावर आपले भाष्य काय?, असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले, की या मुद्द्यावर मी राहुल गांधींना समजावून सांगणे ही तुमची फारच मोठी अपेक्षा आहे. देशात गुंतवणुकीचे वातावरण तयार व्हावे यासाठी मी अनेक उद्योगपतींबाबत चांगले बोललो आहे. भूमिका मांडली आहे. शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद समूह यांच्या बद्दल देखील मी नेहमीच सकारात्मक भूमिका मांडली आहे. तशीच भूमिका मी अदानी समूहाबाबत मांडली आहे. पण ही भूमिका मी काँग्रेसच्या नेत्यांना समजावून सांगितली पाहिजे, ही तुमची फारच मोठी अपेक्षा आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी संबंधित पत्रकाराचा प्रश्न टोलवून लावला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App