प्रतिनिधी
नवी दिल्ली : हावडा येथील रामनवमी मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारावरून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना क्लीन चिट दिल्याचा आरोप स्मृतींनी ममता बॅनर्जींवर केला आहे. त्या म्हणाल्या, ममता आणखी किती दिवस हिंदू समाजावर हल्ले करत राहतील?How long Mamata will continue to attack Hindu society, Smriti Irani’s criticism after Ram Navami violence
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, ममता यांच्या कार्यकाळात घडलेली ही पहिली घटना नाही. याआधी 2022 मध्ये दलित लक्ष्मीपूजन करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. तेव्हाही त्या गप्पच होत्या. वास्तविक, रामनवमीच्या उत्सवादरम्यान हावडा येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत अनेक वाहनांना आग लावण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान दंगलखोरांनी सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची तोडफोड केली आणि वाहने पेटवून दिली.
अमित शहा यांनीही घेतला परिस्थितीचा आढावा
रामनवमी उत्सवादरम्यान हावडा येथे झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी (31 मार्च) या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला. सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तपास सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याशीही बोलून हावडा येथे झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थितीचा आढावा घेतला.
टीएमसी आणि भाजप आमनेसामने
पश्चिम बंगाल भाजप प्रमुखांनी शुक्रवारी (31 मार्च) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून रामनवमीच्या उत्सवादरम्यान हावडा येथे झालेल्या हिंसाचाराची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चौकशी करण्याची मागणी केली. या हिंसाचारानंतर टीएमसी आणि भाजपचे नेते एकमेकांवर सातत्याने वक्तव्य करत आहेत. याआधी ममता यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App