राहुल गांधींच्या अपात्रतेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने टिप्पणी केली होती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जर्मनीचे आभार मानणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर आता काँग्रेसचे माजी नेते आणि खासदार कपिल सिब्बल यांनी निशाणा साधला आहे. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘आम्हाला परदेशातून पाठिंब्याची गरज नाही. हा लढा आमचा आहे. Kapil Sibal says do not need abroad endorsement on Rahul Gandhi democracy
राहुल गांधींच्या अपात्रतेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने टिप्पणी केली होती. या बातमीला रिट्विट करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जर्मन परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
जर्मनीने काय म्हटले? –
जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही भारतातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधातील निर्णय आणि त्यांचे संसदीय सदस्यत्व निलंबनाची दखल घेतली आहे. आमच्या माहितीनुसार, राहुल गांधी या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता आहे.. त्यानंतर हा निर्णय कायम राहणार की नाही आणि स्थगितीला काही आधार आहे का, हे स्पष्ट होईल. याशिवाय प्रवक्त्याने असेही सांगितले की, जर्मनीला अपेक्षा आहे की न्यायालयीन स्वातंत्र्याचे मानदंड आणि मूलभूत लोकशाही तत्त्वे राहुल गांधींविरुद्धच्या कारवाईत समान प्रमाणात लागू होतील.
काय म्हणाले दिग्विजय सिंह?
जर्मनीच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले की, ‘’राहुल गांधींना अडचणीत आणून भारतातील लोकशाहीशी तडजोड केली जात आहे. याची दखल घेतल्याबद्दल जर्मनीचे परराष्ट्र मंत्रालय आणि डॉयचे वेलैचे इंटरनॅशनल एडिटर इन चीफ रिचर्ड वॉकर यांचे आभार.’’
भाजपने साधला निशाणा –
दिग्विजय सिंह यांनी जर्मनीचे आभार मानल्यानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधी पक्ष अंतर्गत कारभारात परकीय हस्तक्षेपाला आमंत्रण देत असल्याचा आरोप भाजपने केला. दिग्विजय सिंह यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी परदेशी शक्तींना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास आमंत्रित केल्याबद्दल राहुल गांधींवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App