इंदूरमध्ये 20 तासांपासून बचावकार्य, मृतांचा आकडा वाढून 35 वर, हवनाच्या वेळी विहिरीचे छत कोसळून पडले भाविक, वाचा सविस्तर

प्रतिनिधी

इंदूर : संपूर्ण इंदूर गुरुवारी रामनवमीच्या उत्सवात मग्न झाले होते. शहरातील सर्वात जुन्या भागांपैकी एक असलेल्या स्नेह नगर येथील बेलेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सकाळचे साडेअकरा वाजले होते. रामजन्मोत्सवासंदर्भात मंदिरात हवन सुरू होते, मात्र लोक आपापल्या जागेवर पूजा करण्यासाठी उभे असताना मोठी दुर्घटना घडली. पायाखालची जमीनच सरकली. डझनभर लोक सुमारे 50 फूट खोल कोसळले.Rescue operation since 20 hours in Indore, death toll rises to 35, roof of well collapsed during havan, devotees read details

नंतर कळले की लोक ज्याला जमीन मानत होते, ते एका विहिरीचे छत होते. मंदिर प्रशासनाने जुनी विहीर न भरता त्यावर लिंटर टाकून झाकण लावले होते. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात बचावकार्य हाती घेण्यात आले. यामध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच लष्कराच्या जवानांची मदत घेण्यात आली.



इंदूरचे विभागीय आयुक्त पवन शर्मा यांनी सांगितले की, या अपघातात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही मदतकार्य सुरू आहे. आतापर्यंत 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांनी सांगितले की, 15 एनडीआरएफ, 50 एसडीआरएफ आणि 75 लष्कराचे जवान बचाव कार्यात सहभागी आहेत.

शिड्या लावून केली लोकांची सुटका

या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विहिरीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शिड्या लावून कसा प्रयत्न करण्यात आला हे दिसत आहे. छत कोसळल्यानंतर विहिरीत अडकलेले लोक जीव वाचवण्यासाठी बाजूला बांधलेल्या पायऱ्यांवर चढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामध्ये लहान मुलांसह महिलांचाही सहभाग होता. बचावकर्ते पायऱ्यांमध्ये शिडी टाकून आणि दोरीने बांधून लोकांना बाहेर काढत होते.

विहिरीतील पाण्याचा उपसा

एकीकडे बचावकार्य राबवून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी विहिरीतील पाण्याचा उपसाही केला जात होता. त्यासाठी मोटार पंप बसविण्यात आले. याशिवाय पाणी आणि गाळ काढण्यासाठी महापालिकेचे पंपही मागवण्यात आले होते.

प्रचंड आरडाओरड, आपल्या नातलगांचा शोध घेत होते लोक

रामनवमीच्या पावन उत्सवासाठी प्रचंड गर्दी जमली होती. मंदिरातील विहिरीच्या छतावर अनेक लोक उभे होते. छताला लोकांचा भार सहन न झाल्याने ते मोडले. लोक विहिरीत पडले, त्यात पाणीदेखील होते.

मंदिर जुन्या विहिरीवर उभारलेले होते. विहीर स्लॅबने झाकलेली होती. विहिरीचे छत मोडून पडल्याने ही मोठी दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच मंदिराबाहेर मोठी गर्दी झाली होती. आक्रोश झाला. लोक आपापल्या कुटुंबीयांचा शोध घेत होते.

केंद्र आणि राज्याने आर्थिक मदत जाहीर केली

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या संपूर्ण घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाइकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जाहीर करण्यात आली आहे.

ही आहेत मृतांची नावे

भारती परमानंद, मधु राजेश, दीक्षा लक्ष्मीकांत, जयवंती परमानंद, लक्ष्मी रतनलाल, इंद्रकुमार थावरलाल, मनीषा आकाश, गंगाबेन गंगादास, भूमिका उमेश, कनक कौशल पटेल, पुष्पा दिनेश राम पटेल, करिष्मा दिनेश पटेल, वर्षा रवी पाल, पिंटू मंगल सिंग, लोकेश सुरेश, पुष्पा रामकरण पाल, शारदा बेन केशवलाल, मेहक राजेश, सुभाष सुखलाल, तनिष रवी पाल, प्रियांका प्रजेश पटेल, राजेंद्र बद्रीनारायण, हितेश प्रेमचंद, नंद किशोर मोहन दास, कस्तुरी बेन मनोहर दास, घनश्याम नौतन दास, सुरेश अरुण दास, जितेंद्र रतन सोलंकी, जया बेन गंगाराम पटेल, विनोद धनजी पटेल, इंद्रा नारायण दास, उषा गुप्ता प्रल्हाद दास, शारदा लाड हुकुमचंद लाड, रतन बेन नानजी पटेल आणि सोमेश खत्री यांचा मृत्यू झाला.

Rescue operation since 20 hours in Indore, death toll rises to 35, roof of well collapsed during havan, devotees read details

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात