सावरकर मुद्द्यावर बॅकफूट वर गेलेली काँग्रेस आता लोकसभा अध्यक्षांविरुद्ध फ्रंटफूट वर!!; आणणार अविश्वास ठराव

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर सत्ताधारी भाजप – शिवसेना, शिवसेनेचा ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे बॅकफूट वर गेलेली काँग्रेस आता लोकसभेच्या अध्यक्षांविरुद्ध फ्रंटफूट वर खेळण्याच्या बेतात आहे. राहुल गांधींचे लोकसभेतून निलंबन आणि त्या पाठोपाठ त्यांना सरकारी बंगला सोडायला सांगण्याची नोटीस या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या काँग्रेसने आपल्या तोफा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिशेने वळविल्या आहेत. Congress on a backfoot on savarkar insult issue, will bring no confidence motion against loksabha speaker om birla

देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे कायदेशीर तरतुदीनुसार त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना 1 तुगलक मार्ग हा सरकारी बंगला सोडण्याची नोटीस काढली. राहुल गांधी हा बंगला सोडणार आहेत. त्यांनी लोकसभा सचिवालयाला तसे लेखी उत्तर देखील पाठवले आहेत.

ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास ठराव

पण त्याच वेळी काँग्रेस पक्ष लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध लोकसभेत अविश्वास ठराव आणण्याचा बेतात आहे. यासाठी काँग्रेसला 50 खासदारांच्या सह्यांची गरज आहे. काँग्रेसचे स्वतःचे लोकसभेत 54 खासदार आहेत. शिवाय बाकीचे 18 विरोधी पक्ष काँग्रेस बरोबर सध्या तरी दिसत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणणे काँग्रेसला कठीण नाही. पण मुळात असा अविश्वास ठराव आणण्याचे मुख्य कारण सावरकर मुद्द्यावरून बॅकफूट वर गेलेल्या काँग्रेसला फ्रंटफूट वर खेळायला यायचे आहे, हे आहे!! यानिमित्ताने सभागृह चालू देऊन सभागृहात अध्यक्षांवर आणलेल्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने काँग्रेसला मोदी सरकारचेही वाभाडे काढता येणार आहेत. काँग्रेस एकाच वेळी रस्त्यावर आणि लोकसभा राज्यसभा सदनांमध्ये लढू इच्छित आहेत.

 ठाकरे आक्रमक, पवारांची मध्यस्थी

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने आक्रमक खेळी करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडले. या कोंडीतून सुटण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकरांचा अपमान करू नका. तो सहन करणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मोठा संघर्ष उभा राहिला. महाविकास आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली. अखेर शरद पवारांना मध्यस्थी करावी लागली. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदान मान्य करावे लागेल. त्यांची सामाजिक बाजूही समजून घ्यावी लागेल, असे वक्तव्य शरद पवारांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी 18 पक्षांच्या बैठकीत केले. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना सावरकरांच्या विषयी समजावून सांगितले. त्याचबरोबर सावरकरांचा मुद्दा अस्थानी उकरून काढू नये, असा सल्ला राहुल गांधींना दिला. तो सल्ला राहुल गांधींनी स्वीकारल्याचे सध्या सांगितले जात आहे.



 ओम बिर्लांच्या “चुका” शोधल्या

पण एकूणच सावरकर प्रकरणात राहुल गांधींमुळे काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले ही वस्तुस्थिती आहे. पण आता या बॅकफूट वरून फ्रंटफूट वर येण्यासाठीच काँग्रेसने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना टार्गेट करायचे ठरवले आहे. यासाठी ओम बिर्ला यांच्या “चुका” शोधण्याचे काम काँग्रेसने केले आहे. ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना अदानी – मोदी संबंधांविषयी लोकसभेत बोलण्याची संधी दिली नाही. राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर तातडीने लोकसभा सचिवालयाने त्यांना दिल्लीतले सरकारी निवासस्थान सोडण्याची नोटीस काढली. ओम बिर्लांची ही “कार्यशैली” आक्षेपार्ह ठरवून काँग्रेस त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या बेतात आहे. म्हणजेच सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेली काँग्रेस आता ओम बिर्लाविरुद्ध फ्रंटफूट वर खेळण्याच्या बेतात आहे. अर्थातच काँग्रेसचे मुख्य टार्गेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम आदानी हे आहेत.

 काँग्रेसचा महिनाभर सत्याग्रह

त्याच वेळी काँग्रेसने देशभरात महिनाभर सत्याग्रह आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला आहे. ब्लॉक कमिटी पासून देशपातळीपर्यंत काँग्रेस राहुल गांधींच्या समर्थनासाठी सत्याग्रह करणार आहे. लोकशाही वाचवा हा त्याचा मोटो आहे.

Congress on a backfoot on savarkar insult issue, will bring no confidence motion against loksabha speaker om birla

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात