अभिमानापस्पद! भारतातील पहिले क्लोन गीर वासरू, कर्नालच्या NDRI संस्थेच्या शास्त्रज्ञांची कमाल

Vasru new

गंगा असे नाव देण्यात आले असून, वासरू पूर्णपणे निरोगी आहे.

विशेष प्रतिनिधी

हरियाणा  कर्नालच्या नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच गीर गायीच्या पहिल्या देशी क्लोनच्या वासराची निर्मिती करण्यात यश आले आहे. या मादी वासराचा जन्म १६ मार्च रोजी झाला होता, मात्र १० दिवस तिची प्रकृती तपासल्यानंतर रविवारी याबाबतची माहिती सार्वजनिक करण्यात आली. तिला गंगा असे नाव देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वासराचे वजन ३२ किलो असून ती पूर्णपणे निरोगी आहे. Indias first cloned indigenous Gir female calf produced at NDRI Institute Karnal

भारतीय नारी जगात भारी…! महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात अव्वल

या प्रयोगात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांच्या टीमने सांगितले की, गिरचे क्लोन करण्यासाठी  अल्ट्रासाऊंड मार्गदर्शित सुया वापरून oocytes जिवंत प्राण्यांपासून वेगळे केले जातात आणि नंतर नियंत्रण परिस्थितीत २४ तास परिपक्व केले जाते. यानंतर संवर्धित गायींच्या शरीरातील पेशी दाता जीनोम म्हणून वापरल्या जातात, ज्या OPU-व्युत्पन्न एन्युक्लेटेड oocytes सह एकत्रित केल्या जातात. रासायनिक सक्रियकरण आणि इन-व्हिट्रो कल्चरनंतर, विकसित ब्लास्टोसिस्ट वासराला जन्म देण्यासाठी संबंधित गायीकडे हस्तांतरित केले जातात.

खूप आव्हानात्मक होते क्लोनिंगचे काम –

DARE सचिव व भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक हिमांशू पाठक आणि NDIR चे संचालक व कुलगुरू धीर सिंग यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांच्या टीमचे अभिनंदन केले. माहिती देताना पाठक म्हणाले की, NDRI ने उत्तराखंड पशुधन विकास मंडळ (ULDP) डेहराडूनच्या सहकार्याने डॉ. एमएस चौहान, माजी संचालक, NDRI यांच्या नेतृत्वाखाली गीर, साहिवाल आणि लाल शिंदी या देशी गायींचे क्लोनिंग सुरू केले आणि यश मिळवले. ते म्हणाले की गायींचे क्लोनिंग करण्याचा हा प्रयोग काही व्यावहारिक आणि ऑपरेशनल अडचणींमुळे खूपच आव्हानात्मक होता.

‘चांगल्या गीर जातीच्या गायींची कमतरता क्लोन पूर्ण करेल’ –

ते म्हणाले की, या तंत्रज्ञानामध्ये भारतीय दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जास्त दूध देणाऱ्या देशी गायींची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. एनडीआरआयचे संचालक धीर सिंग यांनी सांगितले की, शास्त्रज्ञांची टीम दोन वर्षांहून अधिक काळ क्लोन केलेले प्राणी तयार करण्याचा स्वदेशी मार्ग शोधण्यावर काम करत आहे.

गीर जातीच्या गायी जगभर प्रसिद्ध आहेत –

ते म्हणाले की, गुजरातमधील गीर ही मूळ जात दुग्ध उत्पादकांमध्ये लोकप्रिय होत आहे. ते म्हणाले की, गीर गुरे भारताबाहेर खूप लोकप्रिय आहेत आणि झेबू गायींच्या विकासासाठी ब्राझील, युनायटेड स्टेट्स, मेक्सिको आणि व्हेनेझुएलामध्ये निर्यात केली गेली आहेत. विशेष म्हणजे, संस्थेने २००९ मध्ये जगातील पहिली क्लोन केलेली म्हैस तयार केली होती.

Indias first cloned indigenous Gir female calf produced at NDRI Institute Karnal

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात