राणा सनाउल्लाह हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
विशेष दिल्ली
लाहोर : पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सत्ताधारी पीएमएल-एनचा ‘शत्रू’ म्हटले आहे. ते म्हणाले की, इम्रान खान यांनी देशाचे राजकारण अशा वळणावर नेले आहे, की एकतर त्यांची हत्या होईल किंवा आम्हाला मारले जाईल. Either Imran Khan will be assassinated in Pakistan Home Minister Rana Sanaullah sensational statement
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे पीएमएल-एनचे ज्येष्ठ नेते राणा सनाउल्लाह यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषत: इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) मध्ये नाराजी पसरली आहे.
Pakistan Economy News: रमजानमध्ये पाकिस्तानात महागाईमुळे सर्वत्र हाहाकार; केळी ५०० रुपये डझन, तर द्राक्षे तब्बल १६०० रुपये किलो
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंजाबमधील वजिराबाद येथे एका रॅलीदरम्यान झालेल्या हल्ल्यात थोडक्यात बचावल्यानंतर इम्रान खान यांनी या हल्ल्यामागे राणा सनाउल्लाला यांचा हात असल्याचे म्हटले होते. याशिवाय इम्रान खान यांनी हत्येच्या कटातील भूमिकेसाठी एफआयआर मध्ये पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि आयएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नावही घेतले होते.
Either Imran Khan will be assassinated in Pakistan Home Minister Rana Sanaullah sensational statement
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App