एक जण जखमी झाल्याची माहिती आहे, सर्व कर्मचारी सुरक्षित
विशेष प्रतिनिधी
केरळ : भारतीय तटरक्षक दलाचे ALH ध्रुव मार्क3 हेलिकॉप्टर आज कोची विमानतळावरील मुख्य धावपट्टीजवळ कोसळले. अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे, सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर रोटर्स आणि एअरफ्रेम खराब झाली आहे. आयसीजीने अपघाताच्या कारणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. Kerala Coast Guard ALH Dhruv chopper meets with accident in Kochi
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (CIAL) वरून तटरक्षक दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर लगेचच क्रॅश झाले. हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी निघाले होते आणि हेलिपॅडवरून उड्डाण करत असतानाच ते कोसळले, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार एका व्यक्तीच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. ‘कोस्ट गार्ड एन्क्लेव्ह’ हे CIAL कॅम्पसमध्ये आहे.
Kerala: Coast Guard ALH Dhruv chopper meets with accident in Kochi, crew safe Read @ANI Story | https://t.co/M3LpwtgZbl#Kochi #Dhruvchopper #KeralaCoastguard pic.twitter.com/S8wU1rwaHu — ANI Digital (@ani_digital) March 26, 2023
Kerala: Coast Guard ALH Dhruv chopper meets with accident in Kochi, crew safe
Read @ANI Story | https://t.co/M3LpwtgZbl#Kochi #Dhruvchopper #KeralaCoastguard pic.twitter.com/S8wU1rwaHu
— ANI Digital (@ani_digital) March 26, 2023
भारतीय तटरक्षक दलाचे (ICG ALH-DHRUV मार्क 3 हेलिकॉप्टर रविवारी केरळच्या कोचीमध्ये जबरदस्तीने उतरले. हेलिकॉप्टरमध्ये तीन पायलट होते आणि त्यापैकी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी जात होते. पायलट हेलिकॉप्टरची चाचणी घेत असताना जबरदस्तीने लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर सुमारे २५ फूट उंचीवर होते तेव्हा त्याला जबरदस्तीने उतरवावे लागले. ICG ALH ध्रुव फ्लीट ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने काम करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App