महाराष्ट्रातील १ हजार १०० पोलीस स्टेशनमध्ये लवकरच महिलांसाठी ‘हेल्प डेस्क’ सुरू होणार

Woman Help Desk

केंद्र सरकारने निर्भया निधीतून ११ कोटींचा निधी जारी केला आहे.

विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारने निर्भया निधीतून ११ कोटींचा निधी जारी केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृहविभाग लवकरच राज्यभरातील ११०० पोलीस ठाण्यांमध्ये महिलांसाठी हेल्प डेस्क उभारणार आहे. गृहविभागाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, निधीचे संचालन आणि व्यवस्थापन नॅशनल ब्युरो ऑफ क्राइम रेकॉर्ड्सद्वारे केले जाईल, ज्याला गृह मंत्रालयाने नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. याशिवाय अंमलबजावणीची जबाबदारी आयजीकडे सोपवण्यात आली आहे. 1100 police stations across Maharashtra to have help desks  for women soon

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हेल्प डेस्क समोरील पहिले आव्हान म्हणजे पोलीस ठाणे महिलांसाठी अधिक मैत्रीपूर्ण आणि सहज संपर्क साधण्यायोग्य करणे हे असणार आहे. पोलीस ठाण्यात येणा-या कोणत्याही महिलेसाठी हे संपर्काचे पहिले आणि एकमेव ठिकाण असेल. या हेल्प डेस्कवरील पोलीस अधिकारी हा पोलीस स्टेशनमध्ये नोंद होणाऱ्या महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी उत्तम प्रशिक्षित असतील.

डेस्कमध्ये वकील, मानसशास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांसारख्या तज्ञांच्या पॅनेलची नोंदणी केली जाईल, जे बाहेरील मदत मिळविण्यासाठी आश्रय, पुनर्वसन आणि प्रशिक्षण देऊ शकतात. हा डेस्क महिलांच्या प्रकरणांची नोंदणी करेल व  प्रकरणे संबंधित अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करून आवश्यक प्रकरणाचा पाठपुरावाही करेल. या हेल्प डेस्कच्या प्रमुख या महिला अधिकारी असतील व त्यांचे पद हे सहायक पोलीस उपनिरीक्षकापेक्षा खालचे नसेल.

1100 police stations across Maharashtra to have help desks  for women soon

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात