प्रतिनिधी
नवी दिल्ली : जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपूर यांना सोशल मीडिया यूजर्सच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी दुबईची मेट्रो स्थानके भारतातील मेट्रो स्थानकांपेक्षा चांगली असल्याचे वर्णन केले. भारतातील स्थानकांच्या सौंदर्य आणि वास्तुकलेबद्दल निराशा व्यक्त केली.Sanjeev Kapoor gets trolled for comparing India-Dubai metro stations, he said Dubai’s stations are better
संजीव कपूर यांनी दुबई आणि बंगळुरूमधील मेट्रो स्थानकांचे फोटो शेअर केले आणि ट्विटरवर लिहिले, ‘बंगळुरू, गुडगाव, कोलकाता… आमची ओव्हरग्राउंड/ओव्हरहेड मेट्रो स्टेशन्स एवढी आर्टलेस काँक्रीट आयसोर्स का आहेत? म्हणजे ते दिसायला चांगले का नाहीत. दुबई (उजवीकडे) आणि बंगळुरू (डावीकडे) पाहा. हे दुबई मेट्रो स्टेशन 10 वर्षांपूर्वी बांधले गेले असावे.”
अनेक यूजर्सनी केले ट्रोल
संजीव कपूर यांच्या या ट्विटवर अनेक ट्विटर यूजर्स संतापले. त्यांनी संजीव यांना जोरदार ट्रोल केले. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘सामान्यत: हा त्या लोकांचा प्रतिसाद असतो, ज्यांना स्वतःच्या देशाची कदर नाही.’ संजीव कपूर यांचा मुद्दा चुकीचा असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनेक युझर्सनी देशभरातील सुंदर आणि सुसज्ज मेट्रो स्टेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
Delhi Metro for you! pic.twitter.com/HA8z0g6AZZ — Rahul Kapoor (@okwithrk) March 18, 2023
Delhi Metro for you! pic.twitter.com/HA8z0g6AZZ
— Rahul Kapoor (@okwithrk) March 18, 2023
The same station from some distance has this look (not the right part of pic), but yes, most of the stations are box shaped. •Sri Sathya Sai Hospital Metro Station#Bangalore pic.twitter.com/SCWEUxtmk6 — Bangalore Metro Updates (@WF_Watcher) March 18, 2023
The same station from some distance has this look (not the right part of pic), but yes, most of the stations are box shaped.
•Sri Sathya Sai Hospital Metro Station#Bangalore pic.twitter.com/SCWEUxtmk6
— Bangalore Metro Updates (@WF_Watcher) March 18, 2023
Bangalore metro has amazing artwork on the walls. They let artists paint the walls later on. Case in point, church street metro: pic.twitter.com/41ojhy7JQx — Srijan R Shetty (@srijanshetty) March 19, 2023
Bangalore metro has amazing artwork on the walls. They let artists paint the walls later on.
Case in point, church street metro: pic.twitter.com/41ojhy7JQx
— Srijan R Shetty (@srijanshetty) March 19, 2023
बंगळुरू मेट्रोवर व्हाईटफील्ड-केआर पुरम मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार
संजीव कपूर यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा बंगळुरू मेट्रोवरील व्हाईटफिल्ड-केआर पुरम मेट्रो मार्ग (पर्पल लाइन) चे उद्घाटन होणार आहे. 25 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या 13 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात, CEO ने Vodafone-Idea सोबतचा त्यांचा वाईट अनुभव शेअर केला आणि सांगितले की त्यांनी 9 वर्षांनंतर दुसऱ्या सेवेत स्विच करण्याचा निर्णय घेतला. कारण वोडाफोनचे देशाच्या काही भागांमध्ये कव्हरेज खराब आहे आणि आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सही वाईट आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App