प्रतिनिधी
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू आहे. या पर्वात वाराणसीच्या धर्तीवर नाशिक येथे भव्य दिव्य स्वरूपात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून यासंदर्भात आज त्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. समिती गठीत करुन विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. Goda Aarti also in Nashak on the lines of Varanasi
या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी डी. गंगाधारन, यांच्यासह नाशिक महापालिकेचे उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विविध विभागांचे अधिकारी, पुरोहित संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, हा उपक्रम अतिशय भक्तीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण करावयाचा आहे त्यामुळे यामध्ये लोकसहभाग वाढवून सर्वसामान्य जनतेकडून सूचना मागविण्यात याव्यात. आरती ज्या ठिकाणी प्रारंभ करायची आहे तो परिसर तसेच नदी स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी. स्वच्छता केंद्र, आकर्षक रोषणाई, पुरेशी वाहन पार्किंग व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, भाविकांना उभे राहण्याची किंवा बसण्याची प्रशस्त सोय तसेच स्थानिक छोटे व्यावसायिक आणि रहिवाशी यांना विश्वासात घेऊन शिस्तबद्ध रित्या नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
बैठकीत पुरोहित संघाने महत्वपूर्ण सूचना मांडल्या. त्याची दखल सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. आ. देवयानी फरांदे, आ. सीमाताई हिरे, आ. राहुल ढिकले यांनीसुद्धा या चर्चेत महत्वाच्या सूचना मांडल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App