प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी संप पुकारला आहे. अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा अवलंबला आहे. अर्थात कर्मचाऱ्यांच्या या मागणीला एक महत्त्वाचा राजकीय अँगल देखील आहे.Old pension scheme was cancelled by Congress and NCP government itself, but see the difference between old and new pension scheme
जुनी पेन्शन योजना काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत 2005 मध्ये बंद झाली. केंद्रात त्यावेळी सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार सत्तेवर होते, तर महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार सत्तारूढ होते. या दोन्ही सरकारांनी धोरणात्मक निर्णय घेऊन जुनी पेन्शन योजना बंद केली आणि नवीन पेन्शन योजना लागू केली.
आता जेव्हा केंद्रात मोदी सरकार आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार सत्तारूढ आहे, तेव्हा कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करत आहेत आणि त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे.
या पार्श्वभूमीवर नव्या आणि जुन्या पेन्शन योजनेत नेमका काय फरक आहे??, हे लक्षात घेतले पाहिजे.
जुनी पेन्शन योजना
नवी पेन्शन योजना
अर्थात नव्या आणि जुन्या पेन्शन योजनेच्या दरम्यान सातव्या वेतन आयोगाचा ही मुद्दा फार महत्त्वाचा आहे सातव्या वेतन आयोगामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मोठ्या प्रमाणावर वाढला ही देखील वस्तुस्थिती आहे. 1990 च्या दशकातील कर्मचाऱ्यांपेक्षा सन 2000 नंतरच्या तसेच 2010 नंतरच्या कर्मचाऱ्यांचा पगार निश्चितच वाढलेला होता. त्याचबरोबर सध्या देखील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेतन आयोगातील विविध तरतुदींनुसार वाढलेलेच आहेत, ही देखील वस्तुस्थिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App