विशेष प्रतिनिधी
मुंबई : जुनी पेन्शन आणि अन्य काही मागण्यांसाठी महाराष्ट्रातले राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप बेकायदेशीर ठरवून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा शिंदे – फडणवीस सरकारने दिला आहे. पण या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आकडा नेमका किती?? याचे गौडबंगाल तयार झाले आहे. हा खरा आकडा आहे की आकडे फुगवटा??, की फुगवलेली बेडकी??, असा प्रश्नही तयार झाला आहे. कारण राज्य सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे आकडे एवढे वेगळे आहेत की ते एकमेकांशी कुठे जुळतानाच दिसत नाहीत!! State government employees Strike : varied numbers of employees creating serious doubts
राज्य सरकारने विधानसभेत सादर केलेल्या 2022 – 23 च्या आर्थिक पाहणी अहवालात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आकडा 7.50 लाख असा लिहिला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी काढलेल्या पत्रकांमध्ये हेच आकडे 14 लाखांपासून 18 – 19 लाखांपर्यंत फुगवले आहेत. मराठी माध्यमांच्या विविध बातम्यांमध्ये हे आकडे दिसत आहेत. आता यात सरकारी कर्मचारी आणि निम सरकारी कर्मचारी या दोन्हींचा समावेश आहे, असेही बोलले जाते. कारण प्रत्यक्ष राज्य सरकारच्या सेवेतले कर्मचारी हे राज्य सरकारी कर्मचारी मानले जातात, तर महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, विविध महामंडळे यांच्या कर्मचाऱ्यांना निम सरकारी कर्मचारी म्हटले जाते.
आकडेवारीवर खरे उत्तर नाही
गेल्या काही वर्षांपासून सर्व प्रकारच्या सरकारी कर्मचारी संघटनांची एकच ओरड आहे, ती म्हणजे राज्यात सरकार कोणाचेही असो सरकारी कर्मचाऱ्यांची भरतीच केली जात नाही. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांच्या संघटना भरतीसाठी देखील आग्रही असतात. मग जर कोणत्याही सरकारने राज्य कर्मचाऱ्यांची भरतीच केलेली नाही, तर हा आकडा 7.5 लाख, 14 लाख आणि त्यापुढे फुगवून 18 – 19 लाखांपर्यंत कसा गेला??, याचे उत्तर ना सरकारकडे आहे, ना कुठल्या सरकारी कर्मचारी संघटनेकडे!!
संपाला राजकीय वळण
मग संप यशस्वी झाला हे दाखवण्यासाठी हा आकडा फुगवून चांगला सांगितला जातो आहे का??, हाही खरा प्रश्न आहे. कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला तसेही राजकीय वळण लागलेच आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीने कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणच्या मोर्चामुळे सहभाग घेतला आहे. या संपाला आणि मोर्चांना काँग्रेस – राष्ट्रवादीने राजकीय हवा देखील दिली आहे. त्यामुळेच संप यशस्वी झाल्याचा दबाव शिंदे – फडणवीस सरकारवर तयार करण्यासाठी 7.5 लाखांचा आकडा 14 ते 18 – 19 लाखांपर्यंत फुगवला आहे का??, हा प्रश्न तयार होतो आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांचा आकडा किती??
दरम्यानच्या काळात जुन्या पेन्शनची मागणी होत आहे. याचा अर्थ काही कर्मचारी निवृत्तही झाले आहेत आणि अनेक कर्मचारी निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. तिथे देखील नेमके किती कर्मचारी निवृत्त झाले आणि किती निवृत्तीच्या मार्गावर आहेत??, याचाही आकडा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी अधिकृतरित्या दिलेला नाही. त्यामुळे 7.5 लाख ते 14 लाख आणि त्यापुढे जाऊन 18 – 19 लाख या आकड्याचे महाराष्ट्रातले गौडबंगाल कायम आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App