‘’खेळ तुम्ही सुरू केला तर संपवता आम्हालाही येतो’’ असा इशाराही दिला आहे.
प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोपही शीतल म्हात्रे यांनी केला. आता याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज एक खळबळजनक आरोप केला आहे. Mastermind of Sheetal Mhatres morph video in Kalanagar Direct accusation of Nitesh Rane
या पार्श्वभूमीवर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितशे राणेंनी म्हटले की, ‘’शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ जो व्हायरल करण्यात आला आहे आणि जो मार्फ व्हिडिओ आहे. याबद्दलची तक्रार आणि एफआयआर पोलिसांकडे नोंदवला गेला आहे. एफआयआरमधील माहितीनुसार, नेमका हा व्हिडिओ मॉर्फ कोणी केला, मार्फ कोणी केला? यामागे कोण आहे, याबद्दल जर तुम्ही आम्हाला विचाराल तर जी प्रमुख नावं मातोश्री नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्यामध्ये दोन नावं समोर आली आहेत, मानस कुंवर आणि अशोक मिश्रा हे दोघेही युवा सेनेचे आणि ठाकरे सेनेचे पदाधिकारी आहेत. म्हणजे नेमकं हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला? ही मस्ती कोणी केली याचे पुरावे इथे आहेत. मी हेही सांगेन की हे जे व्हायरल करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मागचा मास्टरमाईंड असेल, त्यांना कोणीतरी हे करायला लावलं असेल. माझा थेट आरोप आहे की या मागचा मास्टरमाईंड हा कलानगरमध्ये बसलेला आहे. हे युवासेनेचे पदाधिकारी असतील, तर युवासेनेचा जो प्रमुख आहे, त्यांनी याबद्दल उत्तर द्यावं, की एका महिलेचा अपमान करणारा व्हिडिओ कसा व्हायरल कऱण्या आला?’’
शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ : किती खाली पडाल रे, वरुण सरदेसाईंना टॅग करत नरेश म्हस्केंचे ट्वीट
याशिवाय ‘’जे यांच्याबरोबर राहतील ते चांगले आणि यांना सोडून गेले, तर लगेच त्यांची बदनामी करण्याचं काम या ठाकरे सेनेच्या माध्यमातून पहिल्यापासून सुरू आहे. ही जुनी सवय आहे. म्हणून हा जो कलानगरमध्ये बसलेला मास्टरमाईंड आहे, तुझ्यात जर खरंच मर्दांगी असेल, एका महिलेचा अपमान करण्याची तुला खरंच खूप हौस असेल तर समोर येऊन उल्लेख करेल. आता काय मार्फ व्हिडिओ केवळ एकाचाच होतो असं नाही. जर तुम्ही हा खेळ सुरू करत असाल, तर तो आम्हाला संपवता पण आम्हाला येतो. आम्ही पण डिनो बरोबरचे काही मॉर्फ व्हिडिओ काढू. काही साडेसातनंतरचे व्हिडिओ जून ८ तारखेचे व्हिडिओ दिशाच्या पार्टीचे आमच्याकडेही आहेत. तेही उद्या निघाल्यानंतर तेव्हा बोलायचं नाही की हे मॉर्फ व्हिडिओ आहेत, फेक व्हिडिओ आहेत. कारण हा खेळ तुम्ही सुरू केलेला आहे. ज्या व्यक्तीने हे सगळे व्हिडिओ व्हायरल करायला लावले, त्याची माहिती मी सभागृहात मांडणार आहे.’’ असंही नितेश राणेंनी यावेळी सांगितलं.
याचबरोबर ‘’मी असं ऐकलं की एसआयटीची मागणी झालेली आहे. म्हणजे ही जेव्हा चौकशी येईल, तेव्हा नेमकं याच्या मागचा मास्टरमाईंड कोण? कलानगरमध्ये बसून कोण हे सगळे बदनामीच षडयंत्र रचतोय? याची सगळी माहिती देण्यात येईल. तुम्ही अशाप्रकारे जर महिला पदाधिकाऱ्याची बदनामी करत असाल तर जशास तसे उत्तर देण्यात येईल. या प्रकरणाबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे.’’ असा सूचक इशाराही नितेश राणेंनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App