पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट!

इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिनिधी

इस्लामाबाद :  इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज(सोमवार) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासाठी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.  Arrest warrant against Pakistan former Prime Minister Imran Khan


राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ; राजनाथ सिंह, पीयूष गोयल आक्रमक, म्हणाले…


एका महिला, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात धमकीची भाषा वापरल्याप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने हे वृत्त दिलं आहे. या वृत्तामुळे आता इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे असंही बोललं जातं आहे.

तीन दिवसांपूर्वीच बलुचिस्तान येथील न्यायालयाने इम्रान खान यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मात्र शुक्रवारी तो मागे घेतला. इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील विविध राष्ट्रीय संस्थांच्या विरोधात तिरस्कार पसरवणारी भाषणं केल्या प्रकरणी हा वॉरंट जारी करण्यात आला होता.

Arrest warrant against Pakistan former Prime Minister Imran Khan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात